भारतातील कुस्तीपटू बजरंग पुनियाला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) पुन्हा निलंबित केलं आहे. यासंदर्भात बजरंग पुनियाला नोटीसही बजावण्यात आली आहे. नॅशनल अँटी डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच बजरंग पुनियाला बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी ११ जुलैपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
याआधी बजरंग पुनियाला नाडाने निलंबित केलं होतं. तसेच तीन आठवड्यांनंतर डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने हे निलंबन मागे घेतलं होतं. कारण त्यावेळी बजरंग पुनियाला नोटीस बजावण्यात आली नव्हती. मात्र, आता नाडाने बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई करत नोटीसही बजावली आहे. त्यामुळे बजरंग पुनियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
हेही वाचा : Virat Kohli : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं, ज्यामुळे विराट स्टेजखाली घुसला, पाहा VIDEO
Olympic Medallist wrestler Bajrang Punia suspended by the National Anti-Doping Agency for an anti-doping rule violation.
— ANI (@ANI) June 23, 2024
(file pic) pic.twitter.com/KA4wJ0GJ2H
ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेण्यासाठी आशियाई पात्रता स्पर्धेच्या राष्ट्रीय चाचण्यांदरम्यान नाडाने बजरंग पुनियाला मलमुत्र चाचणीसाठी नमुने देण्यास सांगितले होते. मात्र, बजरंग पुनियाने त्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर निलंबनाविरुद्ध अपील करण्यात आलं होतं. त्यानंतर शिस्तपालन समितीने जोपर्यंत नाडा आरोपांची नोटीस जारी करत नाही तोपर्यंत निलंबन रद्द राहील, असं म्हटलं होतं.
दरम्यान, त्यानंतर आता नाडाने पुन्हा बजरंग पुनियावर रविवारी कारवाई करत नोटीस पाठवली आहे. बजरंग पुनियाला पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये नाडाने म्हटलं की, ही एक औपचारिक नोटीस आहे. यामध्ये तुमच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आता तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. याआधी ज्यावेळी निलंबनाची कारवाई झाली होती, तेव्हा चाचणीस आपण कधीच नकार दिला नव्हता. मात्र, चाचणीसाठी मुदत संपलेले साहित्य वापरण्यात येत असल्याबद्दल आपण त्याबाबत विचारणा केली होती, अशी प्रतिक्रिया बजरंगने त्यावेळी दिली होती.