जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया विवाहबंधनात अडकणार आहे. महिला कुस्तीमध्ये भारताचं नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या फोगट भगिनींपैकी संगिता फोगटशी बजरंगचं लग्न ठरलं आहे. दोन्ही परिवारांमधल्या लोकांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
२०२० साली टोकियो ऑलिम्पिकनंतर विवाहसोहळा पार पडला जाईल. बजरंग भारताकडून ६५ किलो वजनी गटात खेळतो. तर संगिता राष्ट्रीय पातळीवर ५९ किलो वजनी गटात खेळते. आपण आपल्या मुलीच्या इच्छेबाहेर नाही असं म्हणत संगिताचे वडील महावीर सिंह फोगट यांनी संगिता आणि बजरंगच्या लग्नाला पाठींबा दिला आहे.
First published on: 09-08-2019 at 08:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang punia to marry sangeeta phogat psd