राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक यांची यंदाच्या, खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या बैठकीनंतर १२ सदस्यीय निवड समितीने या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१५ साली बजरंगला अर्जुन तर २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या त्बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेत बजरंगने इराणच्या पेइमन बिब्यानीला (६५ किलो) पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. त्याआधी त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत.

दिपा मलिकने २०१६ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त आशियाई खेळांमध्येही दिपाच्या नावावर ३ कांस्य आणि एक रौप्य पदक जमा आहे.

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं पुढीलप्रमाणे –

राजीव गांधी खेल रत्न – बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक (पॅरा अ‍ॅथलिट)

द्रोणाचार्य पुरस्कार – विमल कुमार (बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन (अ‍ॅथलिट)

जीवनगौरव पुरस्कार – मेर्झबान पटेल (हॉकी), रंबीर सिंग खोक्कर (कबड्डी), संजय भरद्वाज (क्रिकेट)

अर्जुन पुरस्कार – तजिंदरपाल सिंग तूर (अ‍ॅथलिट), मोहम्मद अनास याहीया (अ‍ॅथलिट), एस.भास्करन (बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा (क्रिकेट), चिंगलेन साना (हॉकी), अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील (शूटींग), हरमित राजुल देसाई (टेबल टेनिस), पूजा धांडा (कुस्ती), फॉदा मिर्झा (इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू (फुटबॉल), पूनम यादव (क्रिकेट), स्वप्ना बर्मन (अ‍ॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर (पॅरा अ‍ॅथलिट), बी. साईप्रणित (बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल (पोलो)

ध्यानचंद पुरस्कार – मॅन्युएल फ्रेडीक्स (हॉकी), अरुप बसाक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितीन किर्तने (टेनिस), सी. लाल्रेमसंगा (तिरंदाजी)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang puniya and deepa malik nominated for prestigious khelratna award psd