Asian Games 2018 : भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी ६५ किलो वजनी गटात त्याने जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत केले. या बरोबरच बजरंगने भारताला यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताला मिळालेले हे पहिले सुवर्ण पदक आणि हा विजय बजरंगने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले आहे. बजरंगने ट्विट करुन अटलजींना वंदन केले आहे आणि आपले पदक त्यांना समर्पित केले आहे.

बजरंगने सुरुवातीला ६-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ताकातानी याने पुनरागमन करत ६-४ असा सामना रंगात आणला. पण सामन्याच्या अखेरीस ११-८ अशा फरकाने भारताच्या बजरंग पुनियाने सामना जिंकला आणि भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताचे हे संपूर्ण दिवसातील एकमेव सुवर्णपदक ठरले.