वृत्तसंस्था, मॅके

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या ‘अनौपचारिक’ कसोटी सामन्यात भारत ‘अ’ संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, या निकालापेक्षा अखेरच्या दिवशी झालेल्या वादाची चर्चा अधिक रंगली. भारत ‘अ’ संघाच्या खेळाडूंकडून चेंडूशी छेडछाड झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे पंचांकडून सांगण्यात आले. पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णयही घेतला, ज्यावर भारत ‘अ’ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने नाराजी व्यक्त करताना त्यांच्याशी हुज्जत घातली.

IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
The New Zealand team defeated the Indian team in the test match sport news
सपशेल अपयशाची नामुष्की; फिरकीपुढे भारताची पुन्हा दाणादाण
Wriddhiman Saha Announces Retirement on social Media Said That He Will Retire After The Ranji Trophy 2024 Season
टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक निवृत्तीची केली घोषणा, ‘या’ टूर्नामेंटनंतर क्रिकेटला करणार अलविदा

भारत ‘अ’ संघाने विजयासाठी दिलेले २२५ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने सात गडी राखून पूर्ण केले. कर्णधार नेथन मॅकस्वीनी (नाबाद ८८) आणि ब्यू वेबस्टर (६१) यांनी चौथ्या गड्यासाठी केलेली १४१ धावांची भागीदारी निर्णायक ठरली.

हेही वाचा >>>Ind vs New: न्यूझीलंडने भारतात येऊन ‘करून दाखवलं’, ७ अचंबित करणारे विक्रम केले नावावर, जाणून घ्या

रविवारी, सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच चेंडू बदलण्यावरून भारत ‘अ’चे काही खेळाडू आणि पंच शॉन क्रेग यांच्यात शाब्दिक चकमक झाली. भारतीय खेळाडूंनी चेंडूला नखे लावल्याचा दावा पंचांनी केला आणि चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशाप्रकारे चेंडू बदलणे हा ‘मूर्खपणा’ असल्याचे किशन म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

यष्टींमध्ये असलेल्या माइकवरून पंच आणि भारतीय खेळाडू यांच्यातील संभाषण ऐकू आले. ‘‘चेंडूला नखे माराल, तर आम्ही चेंडू बदलणारच. आणखी चर्चा नको, खेळ सुरू करा,’’ असे पंच शॉन क्रेग भारतीय खेळाडूंना म्हणाले. यावर ‘‘आपण या (बदलण्यात आलेल्या) चेंडूने खेळणार तर…हे अतिशय मूर्खपणाचे आहे,’’ अशी टिप्पणी किशनने केली. यावर प्रत्युत्तर देताना पंच क्रेग ‘‘पंचांना विरोध करत आहेस. तुझी तक्रार केली जाईल. हे अयोग्य वर्तन आहे. तुमच्या कृतीमुळे आम्हाला चेंडू बदलावा लागला,’’ असे म्हणाले.

सामन्यानंतर मात्र पंचांकडून चेंडू बदलाबाबत वेगळेच स्पष्टीकरण देण्यात आले. ‘चेंडू चांगल्या स्थितीत नसल्याने तो पंचांना बदलावा लागला,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले होते. तसेच किशनवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले.