वृत्तसंस्था, मॅके
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या ‘अनौपचारिक’ कसोटी सामन्यात भारत ‘अ’ संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, या निकालापेक्षा अखेरच्या दिवशी झालेल्या वादाची चर्चा अधिक रंगली. भारत ‘अ’ संघाच्या खेळाडूंकडून चेंडूशी छेडछाड झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे पंचांकडून सांगण्यात आले. पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णयही घेतला, ज्यावर भारत ‘अ’ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने नाराजी व्यक्त करताना त्यांच्याशी हुज्जत घातली.
भारत ‘अ’ संघाने विजयासाठी दिलेले २२५ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने सात गडी राखून पूर्ण केले. कर्णधार नेथन मॅकस्वीनी (नाबाद ८८) आणि ब्यू वेबस्टर (६१) यांनी चौथ्या गड्यासाठी केलेली १४१ धावांची भागीदारी निर्णायक ठरली.
हेही वाचा >>>Ind vs New: न्यूझीलंडने भारतात येऊन ‘करून दाखवलं’, ७ अचंबित करणारे विक्रम केले नावावर, जाणून घ्या
रविवारी, सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच चेंडू बदलण्यावरून भारत ‘अ’चे काही खेळाडू आणि पंच शॉन क्रेग यांच्यात शाब्दिक चकमक झाली. भारतीय खेळाडूंनी चेंडूला नखे लावल्याचा दावा पंचांनी केला आणि चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशाप्रकारे चेंडू बदलणे हा ‘मूर्खपणा’ असल्याचे किशन म्हणाला.
हेही वाचा >>>IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
यष्टींमध्ये असलेल्या माइकवरून पंच आणि भारतीय खेळाडू यांच्यातील संभाषण ऐकू आले. ‘‘चेंडूला नखे माराल, तर आम्ही चेंडू बदलणारच. आणखी चर्चा नको, खेळ सुरू करा,’’ असे पंच शॉन क्रेग भारतीय खेळाडूंना म्हणाले. यावर ‘‘आपण या (बदलण्यात आलेल्या) चेंडूने खेळणार तर…हे अतिशय मूर्खपणाचे आहे,’’ अशी टिप्पणी किशनने केली. यावर प्रत्युत्तर देताना पंच क्रेग ‘‘पंचांना विरोध करत आहेस. तुझी तक्रार केली जाईल. हे अयोग्य वर्तन आहे. तुमच्या कृतीमुळे आम्हाला चेंडू बदलावा लागला,’’ असे म्हणाले.
सामन्यानंतर मात्र पंचांकडून चेंडू बदलाबाबत वेगळेच स्पष्टीकरण देण्यात आले. ‘चेंडू चांगल्या स्थितीत नसल्याने तो पंचांना बदलावा लागला,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले होते. तसेच किशनवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले.