गोलंदाज म्हणजे कामगार असतो आणि फलंदाज म्हणजे अधिकारी. त्यामुळेच अनेक तरुण मंडळी गोलंदाज होण्यापेक्षा फलंदाज होण्यात धन्यता मानतात, असे मत भारताचा माजी कर्णधार कपिल देवने रविवारी व्यक्त केले.
‘‘गोलंदाज हा मजदूर (कामगार) असतो. गोलंदाज कोणाला व्हायचे आहे? प्रत्येकाला तेंडुलकर, सेहवाग, धोनी किंवा गंभीर यांच्याप्रमाणे अधिकारी व्हायचे आहे’’, असे मत कपिलने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला की, ‘‘सामन्यात पाच बळी घेणाऱ्या गोलंदाजाला शतक साजरे करणाऱ्या फलंदाजापेक्षा कमी मान मिळतो.’’
यावेळी कपिलने सचिनच्या फॉर्मचे कौतुक केले आणि हा फलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये ३० वर्षे अधिराज्य गाजवेल, असे सांगितले. ‘‘सचिनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे पूर्ण केली. त्याने ३० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे, अशा शुभेच्छा मी त्याला देतो. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे,’’ असे कपिल म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा