१५ डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेश विरुद्ध चट्टोग्राम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताने पूर्णपणे वर्चस्व राखले, कारण त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी केवळ मौल्यवान धावाच जोडल्या नाहीत, तर गोलंदाजांनी संपूर्ण दिवसभरात यजमानांना जवळजवळ सर्वबाद केले. मात्र चहापानानंतर नुरुल च्या विकेटच्या वेळी शुबमन गिलचा झेल आणि त्यावरील कोहलीची प्रतिक्रिया ही लक्षात राहण्यासारखी ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने २७८/६ वर पहिल्या दिवसाची सांगता केली होती. पुन्हा मैदानात खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने आपली सातवी विकेट खूप लवकर गमावली. टीम इंडियाच्या २९३ धावा झालेल्या असताना ८६ धावांवर खेळत असलेला श्रेयस अय्यर बाद झाला . त्यानंतर आलेल्या आर अश्विनने (५८) आपले १३वे कसोटी अर्धशतक ठोकले आणि कुलदीप यादवसोबत ८व्या विकेटसाठी ९२ मौल्यवान धावा जोडल्या. त्याने ४० धावा करत कसोटीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. मेहदी हसनला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने अश्विनला बाद केले. अखेरीस मेहदी हसन आणि तैजुल इस्लामच्या प्रत्येकी चार विकेट्सच्या जोरावर भारताचा डाव ४०४ धावांत आटोपला.

प्रत्युत्तरात, मोहम्मद सिराजने डावाच्या पहिल्या चेंडूवर नजमुल हुसेन शांतोला झेलबाद करून डावाची उत्तम सुरुवात केली आणि त्यानंतर उमेश यादवने यासिर अलीला बोल्ड केले. झाकीर हसन (२०) आणि लिटन दास (२४) यांनी बांगलादेशला अधिक नुकसान न पोहोचवता चहापानापर्यंत टिकवून ठेवले. पण त्यानंतर चहापानानंतर लगेचच सिराजने लिटनला बाद केले. कुलदीप यादवने आपल्या फिरकीचा यशस्वी उपयोग करत बांगलादेशच्या मधल्या फळीला नेस्तनाबूत केले. त्याने केवळ ३३ धावा देत ४ गडी बाद केले. त्या ४ विकेट्स मध्ये शकिब अल हसन (३) आणि मुशफिकुर रहीम (२८) यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्सचा समावेश होता.

त्याची एक विकेट बांगलादेशी खेळाडू नुरुल हसनची होती जो खूपच धोकादायक ठरू शकत होता परंतु शॉर्ट लेगवर शुबमन गिलने त्याचा शानदारपणे झेल घेतला. नुरुल फक्त १६ धावा करू शकला. त्या विकेट नंतर गिलला लगेचच विराट कोहलीसह सर्व भारतीय खेळाडूंनी घेरले, जो त्याच्या उत्साहात गिलच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला आणि त्याने त्याचे जवळजवळ चुंबन घेतले.

हेही वाचा: IND vs BAN 1st Test: आले अंगावर घेतले शिंगावर! लिटन दासचे सिराजशी भांडण, मित्राच्या अपमानाने शांत असलेला किंग कोहली झाला जागा

भारताने दिवसअखेर बांगलादेशची धावसंख्या १३३/८ अशी आणून ठेवली असून आणि मेहदी १६ धावांवर आणि इबादत हुसैन १२ धावांवर खेळत होते. बांगलादेशला फोल्लोओन टाळण्यासाठी या जोडीने खेळपट्टीवर टिकून राहणे गरजेचे आहे तर भारताला त्यांना लवकरात लवकर बाद करणे गरजेचे आहे जेणेकरून विजयाचा मार्ग सुकर होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban v ind 2022 nurul hasan got caught out by kuldeep yadav through shubman gil kohli expressed his joy in a unique way avw