BAB vs AFG, Asia Cup 2023: आशिया चषकाचा चौथा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. अफगाणिस्तानचा हा पहिलाच सामना आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ श्रीलंकेकडून पहिला सामना हरला असून बांगलादेशला स्पर्धेत टिकण्यासाठी विजय आवश्यक आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सवर ३३४ धावा केल्या. मेहदी हसन मिराज आणि नजमुल हसन शांतो या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी अफगानिस्तानसमोर ३३५ धावांचे अवघड लक्ष्य ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावा केल्या असून अफगाणिस्तानसमोर ३३५ धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने नाबाद ११२ आणि नजमुल हसन शांतोने १०४ धावा केल्या. या दोघांशिवाय शाकिब अल हसनने नाबाद ३२ आणि मोहम्मद नईमने २८ धावांचे योगदान दिले. रहीमने २५ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि गुलबदिन नायब यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशचे तीन फलंदाज धावबाद झाले. तिसऱ्या विकेटसाठी शांतो आणि मिराजने १९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. आशिया चषकातील बांगलादेशकडून झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. अफगाणिस्तानसाठी ३३५ धावांचे लक्ष्य गाठणे सोपे नसेल.

हेही वाचा: Gautam Gambhir: विराट स्वस्तात बाद झाल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हा काय शॉट आहे, तुमची दोस्ती-यारी…”

आजच्या सामन्यात बांगलादेशला खूप जास्त फरकाने सामना जिंकावा लागेल, म्हणजेच जर पुढील सामना अफगानिस्तानने जरी जिंकला तरी त्यांचा रन रेट हा चांगला राहील. लाहोरची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक आहे. त्यात रात्री ड्यू फॅक्टर असल्यास बांगलादेशला गोलंदाजी करताना अधिक अडचणी येऊ शकतात.

श्रीलंकेत भारत आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर, आशिया चषक २०२३ स्पर्धा पुन्हा एकदा पाकिस्तानात जाईल जेव्हा रविवारी बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ एकमेकांसमोर येतील. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाने श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पाच गडी राखून गमावल्यानंतर, दुसरा सामना कोणत्याही किंमतीत जिंकून सुपर४ मध्ये स्थान निश्चित करायचे आहे. अफगाणिस्तान संघाला पहिला साखळी सामना जिंकून आशिया कप मोहिमेची चांगली सुरुवात करायची आहे.

अफगाणिस्तानकडून खूप आशा आहेत

दरम्यान, अलीकडेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी पाकिस्तानचा सामना केला आणि ३-०च्या फरकाने त्यांचा पराभव झाला. आशिया चषक २०२३ मध्ये अफगाण संघाचे पुनरागमन होईल अशी आशा आहे. हशमतुल्ला शाहिदी अफगाण संघाचे नेतृत्व करत राहील. करीम जनातचे संघात पुनरागमन झाले आहे आणि यामुळे संघाला बळ मिळाले आहे.

हेही वाचा: IND vs PAK: “फालतू कारण देत BCCIने…”, भारत-पाक सामना पावसामुळे रद्द अन् माजी पीसीबी प्रमुख नजम सेठी संतापले

दोन्ही संघाची प्लेईंग ११

बांगलादेश: मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहिद हृदोय, शमीम हुसेन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, हसन महमूद

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान, फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान