Bangladesh vs Sri Lanka, World Cup 2023: विश्वचषकाच्या ३८व्या सामन्यात श्रीलंकेसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चारिथ असालंकाच्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशसमोर विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. त्याचे सात सामन्यांत चार गुण आहेत. दुसरीकडे, बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
श्रीलंकेने २७९ धावा केल्या
श्रीलंकेने बांगलादेशला २८० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले होते. नाणेफेक हरल्यानंतर श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजीला आला. त्याने ४९.३ षटकात २७९ धावा केल्या. चारिथ असालंकाने सर्वाधिक १०८ धावा केल्या. पाथुम निसांका आणि सादिर समरविक्रमाने ४१-४१ धावांचे योगदान दिले. धनंजय डी सिल्वाने ३४, महेश तिक्षणाने २२ आणि कुसल मेंडिसने १९ धावा केल्या. बांगलादेशकडून तनझिमने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
विश्वचषक जसाजसा अंतिम टप्यात येत आहे तसतशी उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी संघांमध्ये अधिक चढाओढ लागली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ अगोदरच उपांत्य फेरीत पोहचले आहेत तसेच, ऑस्ट्रेलिया देखील जवळपास उपांत्य फेरीत पोहचल्यात जमा आहे. दुसरीकडे मात्र, चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा सुरु आहे.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसन याने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लंकन संघ प्रथम फलंदाजी केली. मुस्तफिजुर रहमान फिट नसल्याचे शाकिबने सांगितले. त्यांच्या जागी तंजीम साकिबचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेने दोन बदल केले आहेत. कुसल परेरा आणि धनंजय डी सिल्वा यांचे पुनरागमन झाले आहे. चमिका करुणारत्ने आणि दुशान हेमंथा यांना वगळण्यात आले आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-११
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महेश तिक्षणा, दुष्मंथा चमीरा, कसून राजिथा, दिलशान मदुशंका.
बांगलादेश: तन्झीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, शाकिब-अल-हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, तन्झीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम.