सचिन तेंडमुलकरचा १९९ वा कसोटी सामना मागून घेऊन भव्य-दिव्य सोहळा आयोजित करण्यात क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) यशस्वी झाले असले दिवसेंदिवस नवीन प्रताप त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. बुधवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी सचिनची पत्नी अंजली मैदानात दाखल झाली तेव्हा तिचे स्वागत करताना ‘मिस्टर अंजली तेंडुलकर’ असे नाव झळकवण्यात आले.सामन्याच्या पूर्वसंध्येला सचिनच्या एका छायाचित्राखाली त्याचे नाव चुकवण्यात आले होते. ही चूक थोडी की काय म्हणून बुधवारी पुन्हा एकदा कॅबच्या हातून चूक घडली.
जेव्हा सचिनची पत्नी मुलगा अर्जुनसह उपाहाराच्या काही वेळापूर्वी स्टेडियममध्ये दाखल झाली. तेव्हा तेथील मोठय़ा पडद्यावर ‘वेलकम मिस्टर अंजली तेंडुलकर’ आणि मास्टर अर्जुन तेंडुलकर असे दाखवण्यात आले. काही वेळाने कॅबच्या ही चूक निदर्शनास आली, पण तोपर्यंत संपूर्ण क्रिकेटजगताने कॅबचा हा प्रताप पाहिलेला होता. याबाबत कॅबचे संयुक्त सचिव सबीर गांगुली म्हणाले की, हा सारा प्रकार दुर्दैवी आहे. एका खासगी कंपनीला आम्ही सारे कंत्राट दिले आहे. या चुकांवर कृती घ्यायची वेळ आली असून आम्ही नक्कीच ज्यांच्याकडून चूक झाली त्यांना जाब विचारू. या साऱ्या प्रकाराबद्दल आम्ही जाहीर माफी मागत आहोत. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता आम्ही नक्की घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा