चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा १७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, सलामीची लढत कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अंतिम मुकाबला ४ ऑक्टोबरला बंगळुरू येथे होणार आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा सहावा हंगाम हैदराबाद, मोहाली, बंगळुरू आणि रायपूर अशा चार ठिकाणी होणार आहे. बीसीसीआयने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून, एकूण २९ सामने रंगणार आहेत. स्पर्धेत १० संघ सहभागी होणार असून, पात्रता फेरीचे सामने १३ सप्टेंबरपासून होणार आहेत. ‘अ’ गटात कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स यांच्यासह डॉल्फिन्स, पर्थ स्क्रॉचर्स आणि पात्रता फेरीतील एक संघ असणार आहे.
चॅम्पियन्स लीगची अंतिम लढत बंगळुरूत
चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा १७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, सलामीची लढत कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
First published on: 25-07-2014 at 06:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangalore to host clt20 final