लीच्या दमदार चढाया; नीलेश व गिरीशच्या पकडींची महत्त्वाची भूमिका
महेंद्र रजपूत चढायांमध्ये अपयशी ठरत असताना कोरियाच्या जांग कुन ली (११ गुण) याला खेळवण्याची प्रशिक्षक प्रताप शेट्टी यांची चाल विलक्षण यशस्वी ठरली. बंगाल वॉरियर्सने बंगळुरू बुल्सचा ३४-२४ अशा फरकाने पराभव करून स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
बंगळुरूने मध्यंतराला १३-१२ अशी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात दोन लोण (३०व्या व ३९व्या मिनिटाला) चढवून बंगालने विजयश्री खेचून आणली. नीलेश शिंदे आणि गिरीश इर्नाकच्या पकडींनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बंगळुरूकडून कर्णधार सुरजीत नरवालने एकाकी झुंज दिली.
आजचे सामने
बंगळुरू बुल्स वि. जयपूर पिंक पँथर्स; दबंग दिल्ली वि. यु मुंबा
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि एचडी २, ३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा