Bangladesh vs New Zealand 2nd Test Match: नुकत्याच झालेल्या २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजचा ‘टाइम आऊट बाद’ हा चर्चेचा विषय होता. ज्या संघाविरुद्ध मॅथ्यूजला टाइम आऊट बाद करण्यात आले, तो संघ बांगलादेश होता. आता बांगलादेशी संघाच्या खेळाडूंना अशाच विचित्र पद्धतीने बाद होण्याची वेळ आली आहे. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात आहे. यांच्यातील दुसऱ्या कसोटीत अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम ‘हँडल द बॉल’ म्हणजेच चेंडू खेळल्यानंतर तो हाताने बाजूला टाकणे किंवा क्षेत्ररक्षणात अडथळा आणणे याचा बळी ठरला. खरेतर, ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ या पद्धतीने तो बाद झाला.

‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ या पद्धतीने कधी बाद दिले जाते? ज्यावेळी फलंदाज चेंडू खेळतो आणि त्यानंतर तो चेंडू जर स्टंपवर जात असेल किंवा एखाद्या खेळाडूला झेल घेण्यात, धावबाद करण्यात फलंदाजाने अडथळा निर्माण केला तर त्याला बाद दिले जाते. जेव्हा चेंडू खेळण्याच्या अ‍ॅक्शन किंवा गतीमध्ये असताना त्याच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा फलंदाजाला बाद दिले जाते. अशाचप्रकारे मुशफिकुर रहीमने कृत्य केले आणि तो बाद झाला. याआधी बांगलादेशच्या खेळाडूंनी आयसीसीच्या नियमांचा आधार घेत मॅथ्यूजला टाइम आऊट बाद केले होते, त्याचा बदला न्यूझीलंडने आज घेतला.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली होती. बांगलादेशने पहिल्या डावात ४७ धावांत चार विकेट्स गमावल्या होत्या. झाकीर हसन, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक आणि कर्णधार नझमुल हुसेन शांतो पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर मुशफिकुर रहीमने शहादत हुसेनबरोबर पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करत बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Travis vs Sehwag: “काय मूर्खासारखे प्रश्न…”, ट्रॅविस हेडची वीरेंद्र सेहवागशी तुलना केल्याने अजय जडेजा संतापला

मात्र, ४१व्या षटकात काइल जेमिसन गोलंदाजी करत असताना, रहीम क्रिझच्या आत खेळत होता. कारण, सहा फूट उंचीवरून जेमिसनने टाकलेल्या चेंडूवर फटका मारणे त्याला एवढे सोपे नव्हते. या षटकात आधी बॅकफूटवर बचाव करताना तो बाद होता होता वाचला होता. यानंतर चौथ्या चेंडूवर, त्याने पुन्हा एकदा त्याने बॅकफूटवर फटका खेळला. चेंडू चौथ्या स्टंपपासून खूप दूर होता. त्याने खेळलेला चेंडू स्टंपवर जाण्याची शक्यता नव्हती पण, चेंडू स्टंपला लागण्याच्या भीतीने रहिमने तो हाताने बाजूला केला. चेंडू जर स्टंपवर जात असेल तर त्याला रोखण्याचा अधिकार फलंदाजाला आहे, परंतु यासाठी तो हात सोडून शरीराचा कोणताही भाग वापरू शकतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किंवा अंपायरना विचारल्यानंतरच फलंदाजाला चेंडूला हाताने स्पर्श करण्याचा अधिकार मिळतो.