Bangladesh defeat Afghanistan by 546 runs: बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांत खेळला गेला. हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर पार पडला. या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला. २१ व्या शतकातील कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात ३८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ १४६ धावांवर गारद झाला. यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात ४ विकेटच्या मोबदल्यात ४२५ धावा करत अफगाणिस्तानला केवळ ११५ धावांत गुंडाळले. अशाप्रकारे बांगलादेशने ५४६ धावांनी मोठा विजय नोंदवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.
बांगलादेशने ५४६ धावांनी कसोटी जिंकून ११२ वर्षे जुना विक्रम मोडला –
कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत बांगलादेशचा आता तिसरा सर्वात मोठा विजय आहे. या विक्रमी यादीत इंग्लंड पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९२८ मध्ये इंग्लंडने ६७५ धावांनी विजय मिळवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने १९३४ मध्ये कसोटी सामना ५६२ धावांनी जिंकला होता.
नजमुल हुसेन शांतोने दोन्ही डावात शतके झळकावली –
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत बांगलादेशच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात सलामीवीर महमुदल हसनने ७६ आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नजमुल हुसेन शांतोने १४६ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी मुशफिकुर रहीमने ४७ आणि मेहंदी हसन मिराजने ४८ धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज इबादत हुसेनने गोलंदाजीत चार बळी घेतले. दुसरीकडे तैजुल इस्लाम, मेहंदी हसन मिराज आणि शरीफुल इस्लाम यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – रांचीच्या रस्त्यावर एम एस धोनीचा जलवा! ‘ती’ स्पोर्ट्स कार चालवताना दिसला माही, Video होतोय व्हायरल
बांगलादेशकडून दुसऱ्या डावात नजमुल हुसेन शांतोने पुन्हा एकदा शतक झळकावले. यावेळी शांतोने १२४ धावा केल्या. दोन्ही डावात शतक झळकावल्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. याशिवाय मोमिनुल हकने १२१ धावा केल्या. त्याचवेळी सलामीवीर झाकीर हसनने ७१ आणि कर्णधार लिटन दासने नाबाद ६६ धावा केल्या. गोलंदाजीत तस्किन अहमदने चार आणि शरीफुल इस्लामने तीन बळी घेतले. इबादत हुसेन आणि मेहंदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.