तमिम इक्बाल आणि नईम इस्लामने झळकावलेली अर्धशतके याचप्रमाणे सोहग गाझीने मिळविलेल्या चार बळींच्या बळीवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा ७ विकेट राखून पराभव केला होता. इक्बालने ८ चौकार आणि २ षटकारांच्या साह्याने ५१ चेंडूंत ५८ धावा केल्या, तर इस्लामने नाबाद ५० धावा केल्या. त्यामुळे यजमानांनी ९.२ षटके शिल्लक असतानाच २०० धावांचे लक्ष्य गाठले आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण गाझीने २९ धावांत ४ बळी घेत विंडीजला १९९ धावांत रोखले. गाझीने बांगलादेशकडून ही पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सामनावीर पुरस्कारही पटकावला. त्यानंतर इक्बाल आणि अनमूल हक (४१) यांनी ८८ धावांची सलामी नोंदवली. अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसच्या अनुपस्थितीतही बांगलादेशने प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा