Bangladesh Coach Chandika Haturasingha Suspended: बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शिस्तभंगाच्या कारणावरून निलंबित केले आहे. त्यांना ४८ तासांसाठी निलंबित करण्यात आले आहे आणि त्या कालावधीनंतर त्यांचा करार “तात्काळ संपुष्टात” येईल. त्यांना बोर्डाकडून नोटीसही देण्यात आली आहे. चंडिका हथुरुसिंघा यांची जागा फिल सिमन्स घेतील, जे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळतील.

भारत दौऱ्यामधील संघाच्या खराब कामगिरीमुळे बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांना हटवण्यात आले होते, अशी चर्चा होती. पण खरं कारण तर भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान खेळाडूबरोबर अनुचित वर्तन केल्याबद्दल त्याला निलंबित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषकादरम्यान प्रशिक्षकाने खेळाडूच्या श्रीमुखात लगावल्याची एका खेळाडूच्या आरोपाची बीसीबीने चौकशी केली आहे. हथुरुसिंघा यांचा करार २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत होता, पण या प्रकरणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे .

हेही वाचा – Mithali Raj: “हरमनप्रीतच्या जागी नवा कर्णधार नेमण्याची योग्य वेळ…”, मिताली राजचे भारताच्या वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर मोठं वक्तव्य; दोन नव्या कर्णधारांची नावंही सुचवली

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, BCB चे अध्यक्ष फारुख अहमद म्हणाले, “हथुरसिंघे यांना अनुचित वर्तनाच्या दोन प्रकरणांना सामोरे जावे लागत आहे. पहिली केस एका खेळाडूवर हात उचलण्याची आहे. दुसरी म्हणजे, त्यांच्या करारात नमूद होत्या त्यापैकी जास्त दिवस त्यांनी रजा घेतली.” चंडिका हथुरुसिंघा याच्यावर भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान खेळाडूला मारहाण केल्याचा आरोप होता. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या आरोपांची चौकशी केली.

हेही वाचा – IND vs NZ India Playing 11: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू होणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?

५६ वर्षीय हथुरासिंघे यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बांगलादेशचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते. संघाबरोबचा हा त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. हथुरासिंघे यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात आणि यंदाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेदरम्यान अत्यंत खराब कामगिरी केली होती. बांगलादेशने या वर्षी पाकिस्तानविरुद्ध २-० अशी कसोटी मालिका जिंकणे ही त्यांची या कार्यकाळातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

बांगलादेशने इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला होता, त्याचबरोबर पहिल्यांदाच पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिका जिंकली होती. आता बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेरिूद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर बांगलादेश आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकाही खेळवली जाणार आहे.

Story img Loader