Bangladesh Coach on Bangladesh Players Genetics: भारत वि बांगलादेश मालिकेनंतर बांगलादेशचे सहाय्यक प्रशिक्षक यांनी बांगलादेशच्या खेळाडूंवर मोठे वक्तव्य केले आहे. टी-२० मालिकेतील भारतीय फलंदाज आणि बांगलादेशच्या फलंदाजांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे षटकार मारण्याची क्षमता. भारतीय फलंदाजांनी दोन सामन्यात २२ षटकार ठोकले. तर बांगलादेशला फक्त आठ षटकार मारता आले. नितीश रेड्डीने एकट्याने इतके षटकार मारले आहेत. याबाबत बांगलादेशचे सहाय्यक प्रशिक्षक निक पोथास यांना विचारले असता त्यांनी यासाठी बांगलादेशी खेळाडूंच्या शरीर प्रकृतीला जबाबदार धरले. ते म्हणाला की, १०० किलो वजन असलेला खेळाडू आणि ६५ किलो वजन असलेला खेळाडू यात फरक असतो.

निक पोथास म्हणाला, “त्यांच्याकडे (भारताकडे) खूप मजबूत खेळाडू आहेत. आम्ही ताकद आणि कंडिशनिंगवर काम करतो, पण तुम्ही शरीरप्रकृतीशी तर लढू शकत नाही.” त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पोथास यांनी हा मुद्दा सविस्तरपणे मांडला. ते म्हणाले, “जर एखाद्या खेळाडूचे वजन ९५-१०० किलो आणि दुसऱ्याचे वजन ६५ किलो असेल, तर स्वाभाविकपणे वजनदार खेळाडू मोठा फटका मारेल. अर्थात, वेळ आणि तंत्र महत्त्वाचे आहे आणि आम्ही त्या पैलूंवर सतत काम करत आहोत.

Babar Azam Tweet For Virat Kohli Goes Viral After Pakistan Cricketer Struggling with Bad Form Fans Urge Kohli to Support him
Babar Azam: “हे दिवसही निघून जातील…”, बाबरने विराटसाठी केलेलं ट्वीट होतंय व्हायरल, विराटकडे बाबर आझमला पाठिंबा देण्याची चाहत्यांची मागणी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Border Gavaskar Trophy Sanjay Manjrekar statement on Virat Rohit
विराट-रोहितचा काळ गेला, आता ‘हा’ खेळाडू भारताचा सर्वोत्तम खेळाडू; Border Gavaskar Trophy पूर्वी संजय मांजरेकरांचं वक्तव्य
IND vs BAN Mahmudullah Announces Retirement From T20I Cricket in Press Conference
IND vs BAN: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूने टी-२० क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, पत्रकार परिषदेत केली घोषणा
Ind w vs Pak W match highlights Asha Sobhana
Asha Sobhana : ‘…यासाठी तुरुंगवास व्हायला हवा’, भारतीय महिला क्रिकेपटूवर संतापले चाहते, नेमकं कारण काय?
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
India vs Bangladesh 1st T20I
युवा खेळाडूंच्या कौशल्याचा कस; भारत-बांगलादेश पहिली ट्वेन्टी२० लढत आज
IND vs BAN Rishabh Pant sets Bangladesh fielding video viral
IND vs BAN : ऋषभ पंतने फलंदाजी करताना सेट केली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO पाहून आवरता येणार नाही हसू

हेही वाचा – भारत-न्यूझीलंड कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द, BCCI ने बदलली सामन्याची वेळ; दुसऱ्या दिवसाचा सामना….

आयपीएलवरही केले वक्तव्य

भारतीय फलंदाजांची पॉवर हिटिंग क्षमता वाढवण्याचे श्रेय पोथास यांनी इंडियन प्रीमियर लीगला दिले. ते म्हणाले, “आयपीएलचाही विचार केला पाहिजे, कारण अव्वल दर्जाचे खेळाडू असलेली ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा आहे. आयपीएल आंतरराष्ट्रीय स्तरासाठी खेळाडूंना तयार करते. भारताने मारलेल्या षटकारांच्या संख्येची आमच्याशी तुलना करणे म्हणजे वेस्ट इंडिजने आमच्या तुलनेत किती षटकार मारले याची तुलना करण्यासारखे आहे.”

हेही वाचा – IND vs PAK: “भारताबद्दल बोलण्यावर बंदी…”, पाकिस्तानच्या कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाहा नेमकं काय म्हणाला?

बांगलादेशचे फलंदाज षटकार मारण्यासाठी ओळखले जात नाहीत. टी-२० मोठे फटके खेळणं महत्त्वाचं असतं. बांगलादेशने १७८ सामन्यांत केवळ ६९७ षटकार मारले आहेत. त्यांना एका सामन्यात ४ षटकारही मारता आले नाहीत. सर्वाधिक षटकार लगावणार बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाह आहे, ज्याने १२९ डावांत ७७ षटकार ठोकले आहेत. त्या तुलनेत सूर्यकुमार यादवने अर्ध्या डावात (७०) जवळपास दुप्पट षटकार (१३९) ठोकले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यांचा सर्वाधिक धावा करणारा शाकिब अल हसनही एका हिटसाठी ४० चेंडू घेतो.