ICC Cricket World Cup 2023 BAN vs AFG Match Updates: एकदिवसीय विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानचा संघ ३७.२ षटकात १५६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने ३४.४ षटकांत ४ गडी गमावत १५८ धावा करून सामना जिंकला.

बांगलादेशने अफगाणिस्तानला सहा गडी राखून पराभूत करून विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. या विजयासह त्याचे एका सामन्यात दोन गुण झाले आहेत. ते पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्ताननंतर तिसऱ्या स्थानावर आहेत. तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. उत्तम नेट रन रेटच्या आधारे न्यूझीलंड अव्वल स्थानी आहे. सामन्यात अर्धशतक झळकावण्याबरोबरच तीन विकेट्स घेणाऱ्या मेहदी हसनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
He asked me if I was still taking drugs Alex Hales accuses Tamim Iqbal after during BPL 2025 final controversy
BPL 2025 : ‘तू अजूनही ड्रग्ज घेतोस का?’, सामन्यानंतर तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्समध्ये मैदानातच जुंपली
वृद्धाश्रमासाठी फक्त एक एकर जागा; उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
champions trophy 2025 england urged to boycott afghanistan match by uk politicians ecb
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानविरूद्ध सामना खेळणार नाही? ब्रिटेनच्या नेत्यांचं क्रिकेट बोर्डाला पत्र

शांतो आणि मेहदी यांनी मिळवून दिला विजय –

बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने नाबाद ५९ धावा केल्या. त्याने ८३ चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. मेहदी हसन मिराजने ७३ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या दरम्याने त्याने पाच चौकार मारले. शाकिब अल हसन १४ धावा करून बाद झाला, तर लिटन दास १३ धावा करून बाद झाला. तनजीद हसनने पाच धावा केल्या. मुशफिकुर रहीम दोन धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी, अजमतुल्ला उमरझाई आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्माने संघाची तयारी आणि शुबमन गिलच्या फिटनेसबद्दल दिली मोठी अपडेट; म्हणाला, ‘आमचे खेळाडू…’

शाकिब आणि मेहदीच्या गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज हतबल –

त्तत्पूर्वी अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने सर्वाधिक ४७ धावा केल्या. इब्राहिम झद्रान आणि अजमतुल्ला ओमराई यांनी प्रत्येकी २२ धावांची खेळी केली. रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने प्रत्येकी १८ धावांचे योगदान दिले. राशिद खानला ९, मोहम्मद नबी ६ आणि नजीबुल्ला जद्रानला केवळ पाच ५ करता आल्या. मुजीब उर रहमानने एक धाव घेतली. नवीन उल हक खातेही उघडू शकला नाही. फजलहक फारुकी खाते न उघडता नाबाद राहिला. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. शरीफुल इस्लामला दोन विकेट्स मिळाल्या. मुस्तफिजुर रहमान आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader