Bangladesh Former captain Mashrafe Morataza house set on fire: बांगलादेशची संसद, पंतप्रधानांचे निवासस्थान आणि सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्यानंतर आंदोलकांनी आता माजी क्रिकेट कर्णधार मश्रफी मुर्तझा यांच्या घराला आग लावली आहे. मशरफी मुर्तझा हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्ताय मानले जात होते, ज्यांनी प्रचंड विरोध आणि कोलाहल दरम्यान राजीनामा दिला आणि घाईघाईने बांगलादेश सोडले. या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अवामी लीगचे उमेदवार म्हणून सलग दुसऱ्यांदा जिंकून मुर्तझा हे खुलना विभागातील नरेल-२ मतदारसंघाचे खासदार बनले.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 11: गोल्डन बॉय नीरज चोप्राची कमाल, पहिल्याच थ्रोमध्ये गाठली अंतिम फेरी

Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित, विचारताच म्हणाले; “मी राजीनामा….”
bjp will contest pimpri chinchwad municipal corporation election on alone decision after devendra fadnavis order
मोठी बातमी! भाजप महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार
Former city president of Congress Prakash Wale joined BJP
सोलापुरात काँग्रेसची गळती थांबेना; माजी शहराध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी, माजी शहराध्यक्ष प्रकाश संगप्पावाले भाजपमध्ये
BJP Nitesh Rane kerala mini pakistan statement
नितेश राणे यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार ?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांच्या निषेधानंतर शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आंदोलकांनी मुर्तझा यांच्या घराची तोडफोड केली आणि त्याला आग लावली. मुर्तझा यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ११७ सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे, जो एक विक्रम आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत ३९० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आणि ३६ कसोटी, २२० एकदिवसीय आणि ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २९५५ धावा केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, मुर्तझाने २०१८ मध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीगमध्ये सामील होऊन राजकारणात प्रवेश केला आणि नरेल-२ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

हेही वाचा – T20 Women’s World Cup: बांगलादेशातील अराजकामुळे महिला वर्ल्डकपचं आयोजन धोक्यात? ICC ने दिलं उत्तर

मश्रफी मुर्तझाने ११७ सामन्यांमध्ये बांगलादेश क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. याशिवाय त्यांनी ३६ कसोटी, २२० एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामने खेळले. ३६ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी फलंदाजीत ७९७ धावा आणि गोलंदाजीत ७८ विकेट घेतले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर २७० विकेट आणि १७८७ धावा आहेत. त्यांनी टी-२० मध्ये ४२ विकेट आणि ३७७ धावा केल्या.

बांगलादेशातील अग्रगण्य दैनिक ‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, आंदोलकांनी अवामी लीगच्या जिल्हा कार्यालयाला आग लावली, तसेच अध्यक्षांच्या घराची तोडफोड केली. दरम्यान, हसीना सोमवारी संध्याकाळी दिल्लीजवळील गाझियाबाद येथील हिंडन एअर बेसवर उतरल्या. त्या बांगलादेश हवाई दलाच्या लष्करी विमानाने आल्या, कारण हजारो आंदोलकांनी ढाका येथील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या गण भवनावर हल्ला केला होता. आंदोलकांनी या भागात प्रचंड प्रमाणआत तोडफोडही केली होती.
विनेश फोगाटचा शानदार विजय

Story img Loader