Liton Das ruled out of Asia Cup 2023: आशिया चषक २०२३आधी बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास स्पर्धेबाहेर झाला आहे. यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास व्हायरल फिव्हरमधून जात आहे. याच कारणामुळे तो अद्याप संघात सहभागी होऊ शकलेला नाही. लिटन अद्याप पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेला पोहोचलेला नाही. याच कारणामुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला. लिटनच्या अनुपस्थितीत अनामूल हकचा संघात समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिजॉय घेणार लिटन दासची जागा –

गुरुवार, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी बांगलादेशचा सलामीचा सामना होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) लिटन दासच्या जागी ३० वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज अनामुल हक बिजॉयचा संघात समावेश केला आहे. अनामूल हक बिजॉय ३० ऑगस्टलाच श्रीलंकेला पोहोचणार आहे.

लिटन दास आठ महिने एकही वनडे खेळला नाही –

बीसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशचा सलामीवीर लिटन कुमार दास व्हायरल तापामुळे आशिया चषकासाठी संघासह श्रीलंकेला जाऊ शकला नाही. या आजारातून तो बरा होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. बीसीबी राष्ट्रीय निवड समितीने लिटनच्या जागी ३० वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज अनामुल हक बिजॉयची निवड केली आहे.

हेही वाचा – World Cup 2023: भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याची जबरदस्त क्रेझ, अवघ्या एका तासात विकली सर्व तिकिटं

अनामूल हक बिजॉयने बांगलादेशकडून आतापर्यंत ४४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३ शतकांच्या मदतीने १२५४ धावा केल्या आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने बांगलादेशसाठी भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. बीसीबी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष मिन्हाजुल अबेदिन म्हणाले की, “तो (अनामुल) देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, असे बीसीबी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष मिन्हाजुल अबेदिन यांनी सांगितले. बांगलादेश टायगर्स कार्यक्रमात आम्ही त्याच्यावर बारीक नजर ठेवली होती. तो नेहमी आमच्या यादीत होता.”

हेही वाचा – आशिया चषक: माघार, बहिष्कार, रद्द, कधी वनडे कधी ट्वेन्टी२०-डगमगणारं वारु

बांगलादेशला एकामागून एक धक्के –

लिटन दासपूर्वी इबादत हुसैन आशिया चषकातून बाहेर पडला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. सलामीवीर तमीम इक्बालही पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर होता. गेल्या महिन्यात त्याने निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले पण अवघ्या २४ तासांत त्याने यू-टर्नही घेतला. एकामागून एक मिळालेल्या धक्क्यांचा बांगलादेश संघावर बराच परिणाम झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh player liton das ruled out of asia cup 2023 due to viral fever vbm
Show comments