वेस्ट इंडिजचा ५२७ धावांचा डोंगर समोर असतानाही बांगलादेशने निर्धाराने खेळ करत तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४५५ असे चोख प्रत्युत्तर दिले. नईम इस्लामची शतकी खेळी बांगलादेशच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. माजी कर्णधार आणि अष्टपैलूू खेळाडू शकीब अल हसनने ८९ धावांची खेळी केली. ३ बाद १६४ वरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशला आधार दिला तो शकीब आणि नईमच्या भागीदारीने. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६७ धावा जोडल्या. चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांची सुरेख मिलाफ साधत या जोडीने धावफलक हलता ठेवला.
नईमने कारकीर्दीतले पहिलेवहिले शतक झळकावले मात्र शकीबला शतकाने हुलकावणी दिली. रामपॉलने शकीबला बाद करत ही जोडी फोडली.
यानंतर नईमने कर्णधार मुशफिकर रहीमच्या साथीने ७६ धावा करत वेस्ट इंडिजला तंगवले. डॅरेन सॅमीने नईमला बाद केले. नईमने १७ चौकारांच्या साथीने १०८ धावांची खेळी केली.
नासिर हुसैनने नाबाद ३३ तर महमदुल्लाहने ४२ धावांची उपयुक्त खेळी केल्याने बांगलादेशाने साडेचारशेचा टप्पा ओलांडला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या ६ बाद ४५५ धावा झाल्या आहेत. ते अजूनही ७२ धावांनी पिछाडीवर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा