एकीकडे आयपीएल क्रिकेटची धूम सुरु असताना दुसरीकडे क्रिकेट जगतातून एक दुखद बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू मोशर्रफ हुसेन याचे दीर्घ आजाराने नीधन झाले आह. मेंदूच्या कर्करोगाने ग्रासल्यामुळे त्याच्यावर मागील काही वर्षांपासून उपचार सुरु होते. आजाराची तीव्रता वाढल्यामुळे वयाच्या ४० व्या वर्षी हुसेनची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा >> IPL वर करोनाचं सावट, २२ एप्रिल रोजीच्या राजस्थान-दिल्ली सामन्याबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
मोशर्रफ हुसेनच्या निधनाबबची अधिकृत माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिली आहे. २०१९ साली हुसेनला मेंदूचा कर्करोग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. काही काळासाठी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र नोव्हेंबर २०२० मध्ये आजाराने पुन्हा एकदा तोंड काढले. मागील काही आठवड्यांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याचे निधन झाले.
हेही वाचा >> विश्लेषण : दिनेश कार्तिक का आहे चर्चेत? टी-२० विश्वचषकासाठी तो संघात हवा का?
हुसेनने त्याच्या दोन दशकाच्या कारकिर्दीमध्ये सर्व क्रिकेट प्रकारांमध्ये ५५० पेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या आहेत. बांगलादेश क्रिकेट संघामध्ये असताना त्याने आपला काळ गाजवलेला आहे. बांगलादेशमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ३ हजार धावा तसेच ३०० विकेट्स घेतलेल्या आहेत.
हेही वाचा >> मोठी बातमी! दिल्लीच्या आणखी एका खेळाडूला करोनाची लागण, सामन्याआधीच बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
१९८१ मध्ये ढाका येथे जन्म झालेल्या हुसेनने २००८ ते २०१६ या काळात पाच एकदिवसीय सामने खेळले. या पाच सामन्यांत त्याने चार विकेट्स घेतल्या. २०१३ सालच्या बांगलादेश प्रिमियर लीगच्या अंतिम सान्यात तो सामनावीर ठरला होता.