India vs Bangladesh 2nd Test Bangladesh Super Fan Beaten Up: भारत बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे मध्येच थांबविण्यात आला. तत्त्पूर्वी लंच ब्रेक होण्यापूर्वी कानपूर स्टेडियममध्ये मोठी घटना घडली. बांगलादेशचा सुपर फॅन असलेल्या टायगर रॉबी याने त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. वाघाचा पोशाख परिधान करून टायगर रॉबी बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष मैदानावर जात असतो. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सी ब्लॉक बाल्कनीत बसलेल्या रॉबीला मारहाण का झाली? याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे.
भारत वि. बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याचे वार्तांकन करण्यासाठी बांगलादेशहून आलेल्या पत्रकारांनीही टायगर रॉबीच्या आरोपांवर साशंकता व्यक्त केली होती. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रॉबी सनसनाटीपणा करत असल्याचे पत्रकारांनी सांगितले. एका पत्रकाराने नाव न उघड करण्याच्या अटीवर एनडीटीव्ही स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, रॉबी अनेकदा अशाचप्रकारचे वर्तन करताना आढळला आहे. रॉबी वैद्यकीय व्हिसावर भारतात आला असून तो सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे.
मोहम्मद सिराजबद्दल आक्षेपार्ह विधान केलं
बांगलादेशी पत्रकारांनी पुढे सांगितले की, चेन्नईमध्ये पहिल्या कसोटीदरम्यान रॉबीने भारतीय क्रिकेटपटूंबद्दल आणि विशेषतः मोहम्मद सिराजला अश्लील शिवीगाळ केली होती. पण तिथे कुणाला त्याची भाषा (बंगाली) समजली नाही. त्यामुळे तिथे त्याला कुणी काही बोलले नाही. पण इथे कानपूरमध्ये काहींना त्याची भाषा समजली.
कानपूर कसोटीच्या आदल्या दिवशी रॉबी स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला निर्जलीकरण आणि अतिसाराचा त्रास होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि मैदानात उकाड्यात बसल्यामुळे रॉबीची प्रकृती आणखी खालावली, असेही पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> IND vs BAN: सरप्राईज, सरप्राईज…, आकाशदीपची भेदक गोलंदाजी अन् परफेक्ट निर्णय, रोहित शर्माही झाला अवाक्, पाहा VIDEO
स्थानिक पोलिसांनी एक व्हिडीओही प्रसारित केला आहे. ज्यामध्ये रॉबी पोटावर हात ठेवून अचानक खाली बसल्याचे दिसत आहे. त्याला उभे राहणेही अवघड झाले होते. पोलिसांनी येऊन त्याला उभे राहण्यास मदत केली. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत असून जर रॉबीने काही आगळीक केली असेल तर त्याला पुन्हा बांगलादेशला धाडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
बीसीसीआयनेही रॉबीचे आरोप फेटाळून लावले आहेत. सनसनाटी आरोप करण्याची त्याची जुनी सवय असल्याचे सांगण्यात आले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, चेन्नई मधील पहिल्या कसोटी दरम्यान रॉबीने अशाचप्रकारचे आरोप केले होते. रॉबीला तमिळ भाषा समजत नाही, तरीही त्याने असे आरोप केले होते.