पुढील महिन्यात होणारा बांगलादेशचा प्रस्तावित पाकिस्तान दौरा हा त्या दोन देशांमधील प्रश्न असून या मालिकेसाठी सामनाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची राहील, असे आयसीसीचे अध्यक्ष अ‍ॅलन इसाक यांनी स्पष्ट केले. ‘‘बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या मालिकेसाठी सामनाधिकारी नियुक्त करावे की नाही, हे आयसीसीला ठरवावे लागेल. हा दौरा होणार, हे दोन्ही देशांनी निश्चित करावे. त्यानंतर त्यांनी सुरक्षेविषयीचा अहवाल आयसीसीकडे सादर करावा. त्यानंतरच आयसीसी या मालिकेसाठी सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती करेल,’’ असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader