चेन्नई : सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास दुणावलेला न्यूझीलंड संघ एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध आपली लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यम्सनचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
आतापर्यंतच्या स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने सलग दोन विजय मिळवले असून त्यांची निव्वळ धावगती +१.९५८ अशी आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ चांगल्या स्थितीत आहे. या सामन्यात विजय नोंदवल्यास त्यांची स्थिती आणखी भक्कम होईल. मात्र, चेपॉकच्या धिम्या खेळपट्टीवर त्यांना बांगलादेशच्या फिरकीपटूंचा सामना करताना सावधपणे खेळ करावा लागेल. विल्यम्सन फिरकीविरुद्ध चांगला खेळत असल्याने या सामन्यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल.
हेही वाचा >>> World Cup 2023 : गिलचा तासभर सराव; पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता बळावली
विल्यम्सनचे पुनरागमन होणार असल्याने संघ व्यवस्थापनासमोर निवडीचा पेच निर्माण झाला आहे. विल्यम्सनच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या रचिन रवींद्रने या स्पर्धेत एक शतक व एक अर्धशतक झळकावले आहे. तसेच आघाडीच्या फळीतील विल यंग, डेव्हॉन कॉन्वे व डॅरेल मिचेल यांनीही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विल्यम्सनला संघात स्थान देण्यासाठी न्यूझीलंडला मार्क चॅपमनला संघाबाहेर करावे लागू शकेल.
दुसरीकडे, गेल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झालेल्या बांगलादेशची या सामन्यातही फिरकीपटूंवर मदार असेल. कर्णधार शाकिब अल हसन, मेहदी हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी दोन सामन्यांत ११ गडी बाद केले आहेत. त्यांच्याकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे. फलंदाजीत शाकिब, मुशफिकूर रहीम, लिटन दास व नजमुल शंटो यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
उभय संघांमध्ये आतापर्यंत ४१ एकदिवसीय सामने झाले असून यात न्यूझीलंडने ३० विजय नोंदवले आहेत. बांगलादेशच्या नावे दहा विजय आहेत, तर एका सामन्यात निकाल लागला नाही.
* वेळ : दु. २ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या), हॉटस्टार अॅप (मोफत)