सलामीवीर कौशल सिल्व्हाच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजीचा प्रत्यय दिला. शेर-ए-बांगला स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात सिल्व्हाच्या १३९ धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकेने दिवसअखेर ५ बाद ३७५ धावा केल्या आहेत. सिल्व्हाने दिम्युथ करुणारत्ने (५३)सोबत पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. मग अनुभवी कुमार संगकारा (७५) समवेत दुसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली.