भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेला आज ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवरील पहिल्या सामन्याने सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाातील हा सामना सकाळी साडे अकराला सुरु होणार आहे. त्तत्पुर्वी दोन्ही संघांतील कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. या अगोदर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. ते आता भारतीय संघात पुनरागमन करत आहेत.

त्या संघाची कमान शिखर धवनने सांभाळली होती. त्याचबरोबर त्या मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला होता. या मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यातून कुलदीप सेन भारतीय वनडे संघात पदार्पण करत आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश हेड टू हेड –

टीम इंडियाने बांगलादेशमध्ये आतापर्यंत २२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यांनी १७ जिंकले आहेत. त्याचबरोबर बांगलादेशने ४ जिंकले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल गालला नाही. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३६ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ३० जिंकले आहेत, तर पाचमध्ये बांगलादेशने विजय मिळवला आहे. दरम्यान एका सामन्याचा निकाल लागला नाही.

हेही वाचा – IND vs BAN 1st ODI: भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान, जाणून घ्या पहिली वनडे कधी आणि कुठे बघायला मिळणार

पहिल्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसेन

Story img Loader