Ibadot Hussain Out Of World Cup 2023: बांगलादेश क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे जेव्हा बीसीबीच्या अधिकाऱ्याने बुधवारी उघड केले की, वेगवान गोलंदाज इबादोत हुसेन गुडघ्याच्या दुखापतीमुळे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. इबादोत हुसेनला त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीच्या बरे होण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, याचा अर्थ तो यापुढे २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात निवडीसाठी उपलब्ध असणार नाही.
क्रिकबझच्या म्हणण्यानुसार, बीसीबीचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल अबेदीन यांनी बुधवारी सांगितले की, विश्वचषकादरम्यान इबादोत आमच्यासाठी उपलब्ध असणार नाही. तो म्हणाला, “हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही विश्वचषकासाठी त्याचा विचार करू शकत नाही. कारण त्याला ऑपरेशनमधून बरे होण्यासाठी निःसंशयपणे वेळ लागेल, किमान तीन ते चार महिने.”
गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान इबादोत हुसेनला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा अँटीरियर क्रूसीएट लिगामेंट (एसीएल) फाटला होता. त्यामुळे त्याला आशिया कपमधूनही बाहेर पडावे लागले. हुसेनच्या जागी तंजीम साकिबला आशिया कप २०२३ साठी संधी मिळाली आहे.
बांगलादेशचा वनडे कर्णधार शाकिब अल हसन आणि मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा आशिया कपमधून इबादोत हुसेनच्या बाहेर पडल्याने दु:ख झाले. शाकिबने ढाका येथे २६ ऑगस्ट रोजी प्री-सीरिजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले होते की, “इबादोत आमच्यासोबत नाही, हे खूप दुखद आहे. कारण तो आमच्या संघाचा एक महत्त्वाचा भाग होता आणि हे लक्षात घेता ते खूपच निराशाजनक आहे.”
इबादोतच्या अनुपस्थितीत तस्किन अहमद नवीन चेंडूची जबाबदारी सांभाळेल. आशिया चषक २०२३ मधून उपकर्णधार लिटन दासची बाहेर झाल्यामुळे बांगलादेशला बुधवारीच मोठा धक्का बसला. लिटन दास २७ ऑगस्ट रोजी बांगलादेश संघासह श्रीलंकेला रवाना झाला नव्हता. दास २८ ऑगस्ट रोजी संघात सहभागी होणार होता, परंतु त्यांचा ताप कमी झाला नाही, त्यामुळे तो श्रीलंकेला रवाना होऊ शकला नाही.