दर्जेदार खेळाडूंचा भरणा असूनही, लौकिलाला साजेसा खेळ करता येत नसल्याने बार्सिलोना संघाला ‘ला लिगा’ फुटबॉल स्पर्धेत वारंवार पराभवाला सामोरे जावे लागत आहे. मात्र या पराभवातून शिकत बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत मँचेस्टर सिटीसारख्या तगडय़ा संघाला २-१ फरकाने नमवत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. अन्य लढतीत पॅरिस सेंट जर्मेन संघाने बायर लेव्हरक्युसेनवर २-१ अशा फरकानेच विजय मिळवला. विजयासह बार्सिलोनाने अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या साथीने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये स्थान पटकावले आहे.

Story img Loader