ला लीगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत रिअल माद्रिदने स्वत:चे स्थान कायम राखताना अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बार्सिलोनावर दबावतंत्र कायम राखले आहे. जेम्स रॉड्रिग्ज आणि अल्वारो अर्बेलोओ यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर माद्रिदने गुरुवारी अल्मेरिया संघाचा ३-० असा पराभव केला. या विजयामुळे बार्सिलोना (८४) आणि माद्रिद (८२) यांच्यात ५ गुणांचे अंतर कमी होऊन अवघ्या २ गुणांचे राहिले आहे.
बार्सिलोनाने २४ तासांपूर्वी गेटाफे संघाचा ६-० असा धुव्वा उडवून पाच गुणांची आघाडी घेत कार्लो अँसेलोट्टीच्या माद्रिद संघावर दडपण निर्माण केले होते. मात्र, माद्रिदने त्यातही सर्वोत्तम कामगिरी करताना अल्मेरियावरील विजयासह तीन गुणांची कमाई केली. सामन्याच्या पूर्वाधात चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. मात्र, रॉड्रिग्जने ४५व्या मिनिटाला गोल करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. रॉड्रिग्जने अल्मेरियाची बचावफळी भेदून २५ यार्डावरून अप्रतिम गोल केला. मध्यंतरानंतर माउरो डॉस सांतोसच्या स्वयंगोलने माद्रिदची आघाडी २-० अशी भक्कम
केली. त्यात ८४व्या मिनिटाला अर्बेलोआने गोल करून माद्रिदच्या विजयावर ३-० अशी शिक्कामोर्तब केला.
*अॅटलेटिको माद्रिदने फर्नाडो टोरेसच्या गोलच्या बळावर विल्लारीअलचा १-० असा पराभव करून तिसरे स्थान कायम राखले आहे.
*सेविल्ला संघ सहा गुणांच्या फरकाने अॅटलेटिकोच्या पिछाडीवर आहे. त्यांनी एइबर संघावर ३-१ असा विजय मिळवत चौथ्या स्थानावर झेप घेतली.
* केल्टा व्हिगोने १-० असा मलागावर, तर एलचे संघाने ४-० असा डेपोर्टीव्हो ला कोरुनावर विजय साजरा केला.
रिअल माद्रिदचे बार्सिलोनावर दबावतंत्र कायम
ला लीगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत रिअल माद्रिदने स्वत:चे स्थान कायम राखताना अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बार्सिलोनावर दबावतंत्र कायम राखले आहे.
First published on: 01-05-2015 at 05:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona and real madrid