चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
चेल्सी स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता
बार्सिलोना आणि बायर्न म्युनिच या संघांनी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत बाद फेरीत धडक मारली. मात्र कामगिरीत सातत्य राखता न आल्याने चेल्सीवर प्राथमिक फेरीतच बाद होण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.
बार्सिलोना आणि बायर्नसह वॉलेन्सिआ आणि शाख्तर डोन्टेस्क या संघांनी बादफेरीत प्रवेश मिळवला आहे, तर सेल्टिकला बादफेरीत प्रवेशाची संधी आहे.
रॉबटरे डि मॅटोच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेल्सीच्या संघाचा ज्युवेन्टसने ३-० असा धुव्वा उडवला तर शाख्तर डोन्टेस्कने अनुनभवी नॉर्ड्सजालँडला सहज नमवल्याने चेल्सीपुढील बादफेरीचे आव्हान खडतर बनले आहे.
चॅम्पियन्स लीगचा मागचा हंगाम आमच्यासाठी स्वप्नवत ठरला होता आणि यंदा मात्र प्राथमिक फेरीतून अंतिम सोळामध्ये दाखल होणेही आमच्याकरता अवघड झाले आहे अशा शब्दांत चेल्सीचा कर्णधार पीट्र सेचने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्युवेन्टस संघाने सुरेख खेळ केला तर शाख्तरने याआधीच पुढील फेरीत जागा पक्की केली आहे. पुढील फेरीत जाण्याचा मार्ग अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. बार्सिलोनाने जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली आहे. सेल्टिककडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यानंतर स्पार्टाकवर ३-० विजय मिळवत त्यांनी दणक्यात पुनरागमन केले. दोन गोल झळकावणारा लिओनेल मेस्सी या विजयाचा शिल्पकार ठरला. रुड व्ॉन निसटेलरॉय यांच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील ५६ गोलांच्या विक्रमाची मेस्सीने बरोबरी केली.
बायर्न म्युनिचने वॉलेन्सिआशी लढत १-१ ने बरोबरीत सोडवली. मात्र आधीच्या लढतीत सहज विजय नावावर असल्याने बायर्नने बादफेरीत प्रवेश मिळवला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा