इवान रॅकिटिकने पूर्वार्धात नोंदविलेल्या एकमेव गोलच्या बळावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आह़े  बार्सिलोनाने अंतिम १६ संघांमधील शेवटच्या लीग सामन्यात मँचेस्टर युनायटेडवर १-० असा विजय साजरा केला आणि ३-१ अशा सरासरीच्या बळावर उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केल़े  रॅकिटिकने ३१ व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीच्या पासवर बार्सिलोनासाठी पहिला गोल केला़  त्यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे बार्सिलोनाने पूर्वार्धातील आघाडीच्या बळावर विजय निश्चित केला़
कार्लोस तेवेझच्या खेळाच्या जोरावर जुवेंटस संघानेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़  त्यांनी २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या बोरुसिआ डॉर्टमुंड संघावर ३-० असा दणदणीत विजय मिळवला़  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा