मँचेस्टर सिटीसारख्या बलाढय़ संघाशी दोन हात करण्यापूर्वी ला लिगा फुटबॉल स्पर्धेमध्ये बार्सिलोनाने रायो व्हॅलोकानो संघावर दणदणीत विजय मिळवला. अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या दोन गोलसहित बार्सिलोनाने रायो व्हॅलोकानोचा ६-० असा धुव्वा उडवला.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अँड्रिअॅनोने गोल लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मेस्सीनेही ३६व्या मिनिटाला सुरेख खेळाचा नमुना पेश करत गोल लगावला. सामन्याच्या पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी बार्सिलोनाने घेतली. दुसऱ्या सत्रात ५३व्या मिनिटाला अॅलेक्सिस सँचेस व ५६व्या मिनिटाला प्रेडोने गोल लगावले. मेस्सीने ६८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला.  नेयमारने ८९व्या मिनिटाला गोल लगावला.

Story img Loader