इस्टाडिओ डे व्हॅलेन्सिआ स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत बार्सिलोनाने २-० अशा फरकाने लेव्हँटे क्लबवर विजय मिळवून ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
डेव्हिड नाव्हारो (२१ मि.) स्वयंगोलने बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यात ९०व्या मिनिटाला लुईस सुआरेझने गोल करून भर घालत २-० असा विजय निश्चित केला.

 

जेतेपदाच्या शर्यतीत लेस्टरला अघाडी
पीटीआय, लंडन
इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) जेतेपदासाठी शर्यतीत असलेल्या लेस्टर सिटी आणि मँचेस्टर सिटी यांच्यातील चुरशीत लेस्टरने स्पष्ट आघाडी घेतली आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत रॉबर्ट हथच्या दोन गोलच्या जोरावर लेस्टरने ३-१ अशा फरकाने मँचेस्टर सिटीचा पराभव करून पाच गुणांची आघाडी घेतली आहे. दुसरीकडे टॉटनहॅम हॉटस्पूरने वॉटफोर्डवर १-० असा विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
रॉबर्ट हथने (३ मि. व ६० मि.) आणि रियाद मेहरेझ (४८ मि.) यांनी गोल करून लेस्टरचा विजय साकारला. सर्गिओ अ‍ॅग्युएरो (८७ मि.) वगळता सिटीच्या इतर खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले.

Story img Loader