बार्सिलोनाने ला लीगा (स्पॅनिश लीग) फुटबॉल स्पर्धेत व्हिलारिअल संघावर २-१ असा विजय मिळवत रिअल माद्रिदपेक्षा पाच गुणांनी अव्वल स्थान पटकावले आहे. नेयमारने दोन गोल करत बार्सिलोनाच्या विजयात चमक दाखवली. दोन गोल्सने पिछाडीवर पडलेल्या रिअल माद्रिदने सुरेख कामगिरी करून ओसासुनाविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. ओरिएल रिएरा याने १५व्या आणि ३९व्या मिनिटाला गोल करून ओसासूनाला दमदार सुरुवात करून दिली होती, पण इस्कोने ४५व्या आणि पेपे याने ८०व्या मिनिटाला गोल केल्यामुळे रिअल माद्रिदला एका गुणाची कमाई करता आली.

Story img Loader