नेयमार आणि लिओनेल मेस्सी या बार्सिलोनाच्या दिग्गज खेळाडूंना अॅजेक्सविरुद्धच्या चॅम्पियन्स लीगच्या सामन्यामध्ये गोल करत संघाला सहज विजय मिळवून दिला. बार्सिलोनाचा संघ रीअल माद्रिद संघाबरोबर सामना खेळणार असून या सामन्याची चांगली तयारी झाल्याचे या विजयातून सर्वासमोर आले आहे.
बार्सिलोनाकडून नेयमार, मेस्सी आणि सँड्रो रामीरेझ यांनी गोल करत संघाला ३-१ असा विजय मिळवून दिला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला मेस्सीने नेयमारकडे चेंडू टोलवला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत नेयमारने संघाचे खाते उघडले. त्यानंतर सात मिनिटांनी मेस्सीने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर होणारे महत्त्वपूर्ण सामने पाहता संघाचे प्रशिक्षक लुइस एनरिक्यू यांनी दुसऱ्या सत्राच्या खेळातून नेयमार, मेस्सी आणि आंद्रेस इनिएस्टा बाहेर काढले.
पहिल्या सत्रामध्ये आक्रमक खेळ केल्यावर दुसऱ्या सत्रात मात्र त्यांच्याकडून जास्त आक्रमक खेळ झाला नाही. सामन्याच्या ८८व्या मिनिटाला एल गाझीने गोल करत संघाला पहिला गोल करून दिला. पण त्यानंतर दोन मिनिटांनंतर बार्सिलोनाच्या रामीरेझने गोल केला.
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : नेयमार, मेस्सी चमकले
नेयमार आणि लिओनेल मेस्सी या बार्सिलोनाच्या दिग्गज खेळाडूंना अॅजेक्सविरुद्धच्या चॅम्पियन्स लीगच्या सामन्यामध्ये गोल करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
First published on: 23-10-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona stars messi and neymar shine bright in win over ajax