अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पेनेल्टीच्या संधीचे सोने करता आले नसले तरी बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेमध्ये लेव्हांटे संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. नेयमारने सलामीचा गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या १२व्या मिनिटाला मेस्सीकडून पेनेल्टीची संधी हुकली, पण इव्हान रॅकिटिकने दुसरा गोल लगावला आणि मध्यतंरापर्यंत बार्सिलोनाकडे २-० अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रामध्ये सँड्रो रामिरेझ, प्रेडो रॉड्रिगेझ आणि मेस्सी यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा