मेस्सीकडून आणखी एक शिखर सर; क्लबकडून ३५१ गोल करणारा पहिला खेळाडू
ला लिगा फुटबॉल स्पर्धा
ला लिगा फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करणाऱ्या बार्सिलोनाने रविवारी डेपोर्टिव्हो अॅलव्हेसवर २-० अशी मात केली. मात्र, या विजयाला झळाळी आली ती लिओनेल मेस्सीच्या आणखी एका विक्रमाने. बार्सिलोना क्लबकडून ३५१ गोल करण्याचा शिखर मेस्सीने या लढतीत सर केला. पेनल्टी स्पॉट किकची संधी गमावल्यानंतर मेस्सीने दोन गोल करत बार्सिलोनाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
अर्जेटिनाच्या मेस्सीला पहिल्या सत्रात पेनल्टी स्पॉट किकवर गोल करण्यात अपयश आले. मात्र, मध्यंतरानंतर त्याने आपला दबदबा सिद्ध करताना दोन गोल केले. अॅलव्हेसची ला लिगामधील सुरुवात पराभवाने झाली, परंतु बार्सिलोनाविरुद्धच्या लढतीत त्यांनी आपल्या खेळाचा स्तर उंचावलेला पाहायला मिळाला. लुईस सुआरेझच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाची आक्रमण फळी कमकुवत पडल्याचे जाणवत होते, परंतु आंद्रे इनिएस्टाने हा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. ५५ आणि ६६ मिनिटाला मेस्सीने गोल करत बार्सिलोनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ५५व्या मिनिटाचा गोल हा बार्सिलोनासाठी मेस्सीने केलेला ३५०वा गोल ठरला. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला मेस्सीने टोलावलेला चेंडू गोलखांब्यावर आदळला आणि मेस्सीची हॅट्ट्रिक हुकली.
३५०
युरोपातील अव्वल पाच लीगमधील एकाच क्लबसाठी ३५०हून अधिक गोल करणारा लिओनेल मेस्सी हा दुसरा खेळाडू आहे. या विक्रमाच्या अग्रस्थानावर बायर्न म्युनिकचा गेर्ड म्युलर ३६५ गोल्ससह विराजमान आहे.
२०
पाच वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या कारकीर्दीत २० वेळा पेनल्टी स्पॉट किकवर गोल करण्याची संधी गमावली.
खडतर आव्हानातून विजय मिळवल्याचा आंनद आहे. आमच्याकडे आता सहा गुण आहेत आणि अशीच आगेकूच कायम राखायची आहे.
– एर्नेस्टो व्हॅल्व्हेर्डे, बार्सिलोना क्लबचे प्रशिक्षक
अॅटलेटिको माद्रिदचा दमदार विजय
अँटोइने ग्रिएझमनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या अॅटलेटिको माद्रिदने रविवारी लास पलमास क्लबवर ५-१ असा दणदणीत विजय मिळवला. डिएगो सिमॉन यांची प्रशिक्षक म्हणून हा २००वा सामना होता आणि अॅटलेटिकोने त्यांना विजयी भेट दिली. एंजल कोरी, यानिक कॅरास्को व थॉमस पार्टीय यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर कोकेने दोन गोल करताना महत्त्वाची भूमिका पार पाडली.