Barinder Sran Announces Retirement: सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. अलीकडेच, शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजचा गोलंदाज शॅनन गॅब्रिएलने क्रिकेटला अलविदा केला. आता आणखी एका क्रिकेटपटूच्या निवृत्तीची मोठी बातमी समोर येत आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण करणाऱ्या या भारताच्या खेळाडूने निवृत्ती घोषित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर स्राणने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर आपल्या निर्णयाची माहिती देताना ३१ वर्षीय स्राणने म्हटले की, निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. बरिंदरने फोटो पोस्ट करत लांबलचक कॅप्शन दिले आहे आणि त्यामध्ये भारतासाठी आणि आयपीएलमध्ये क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली याबद्दल आभार मानले आहेत.

हेही वाचा – Joe Root: जो रूटचे कसोटीत विक्रमी ३३ वे शतक, ४ वर्षात १६ कसोटी शतकं झळकावत फॅब फोरमध्ये मिळवलं पहिलं स्थान, विराट कोहली….

बरिंदर स्राण म्हणाला की, मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, या प्रवासासाठी त्याने सर्वांचे मनापासून आभार मानले. तो म्हणाला की २००९ मध्ये बॉक्सिंगमधून क्रिकेटकडे वळल्यानंतर असंख्य आणि अविश्वसनीय अनुभव मिळाले. वेगवान गोलंदाजी त्याच्यासाठी भाग्यवान ठरली आणि त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१६ मध्ये भारतीय संघाकडून खेळण्याचा बहुमान मिळाला.

तो पुढे म्हणाला की, जरी आंतरराष्ट्रीय कारकीर्द लहान असली तरी क्रिकेटशी संबंधित आठवणी कायम माझ्या हृदयात राहतील. योग्य प्रशिक्षक आणि मॅनेजमेंट यासाठी देवाचे आभार. शेवटी तो म्हणाला की, आकाशाप्रमाणे स्वप्नांनाही मर्यादा नसतात, त्यामुळे स्वप्न पहात राहा.

हेही वाचा – Radha Yadav: पुरात अडकली होती भारतीय महिला क्रिकेटपटू, NDRF च्या पथकाने केली सुटका, पोस्ट करत मानले आभार

किंग्ज इलेव्हन पंजाबची जाहिरात पाहून बरिंदर स्राणने क्रिकेट खेळायला सुरुवात केली ज्यात तरुणांना चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याआधी तो हरियाणातील भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये बॉक्सर म्हणून प्रशिक्षण घेत होता. त्याला आयपीएल करार मिळाला नाही, परंतु एक मुलगा जो तोपर्यंत फक्त टेनिस बॉल्सने ग्रामीण क्रिकेट खेळत होता, त्याने किंग्स कप गाठला आणि पंजाबमधील टॉप ३५-४० अनकॅप्ड क्रिकेटर्सपैकी एक बनला.

अखेरीस, त्याला राजस्थान रॉयल्सने २०१५ च्या आयपीएल लिलावात संघात घेतले. स्राणच्या क्रिकेट प्रवासातील सर्वात मोठा क्षण एक वर्षानंतर आला जेव्हा त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली. तोपर्यंत त्याच्या नावावर फक्त आठ लिस्ट ए सामन्यांचा अनुभव होता. त्याने १२ जानेवारी रोजी पर्थ येथे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ५६धावांत ३ विकेट घेतले.

हेही वाचा – Paris Paralympics: हाताविना तिरंदाजी करणाऱ्या शीतल देवीची पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक सुरूवात, अवघ्या एका गुणाने हुकला विश्वविक्रम, पाहा VIDEO

पदार्पणाच्या टी-२० सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या खेळाडूची निवृत्ती

जून २०१६ मध्ये झिम्बाब्वेच्या टी-२० दौऱ्यासाठी बरिंदर स्राणची देखील संघात निवड झाली होती, जिथे त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हरारे येथील दुसऱ्या सामन्यात त्याने १० धावांत ४ विकेट घेत सामनावीर ठरला. कोणत्याही भारतीय गोलंदाजाची पदार्पणातील टी-२० मधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एकूणच स्राणने २०११ ते २०२१ दरम्यान १८ प्रथम श्रेणी, ३१ लिस्ट-ए आणि ४८ टी-२० सामने खेळले. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. फेब्रुवारी २०२१ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये स्राण पंजाबकडून शेवटचा सामना मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता.

बरिंदर स्राण हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आणि २०१५ ते २०१९ दरम्यान २४ सामन्यांमध्ये त्याने १८ विकेट घेतले. २०२०-२१ विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने मध्य प्रदेश विरुद्ध पंजाबसाठी शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला. त्याने १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४७ विकेट्स घेण्यासोबतच ३१ लिस्ट ए सामन्यांमध्ये ४५ विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर ४८ टी-२० सामन्यात ४५ विकेट आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barinder sran announces international retirement from cricket shares emotional post on social media bdg