Virender Sehwag on Asia Cup 2023: पावसामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान हा महान सामना रद्द करण्यात आला होता, त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ACC वर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी प्रथम एसीसीची खिल्ली उडवली. मात्र, यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना वाया गेल्याने भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एसीसीवर टीकास्त्र सोडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीरेंद्र सेहवागने सोशल मीडिया ट्वीटरवर ACCवर टीका केली आणि लिहिले, “यार, आम्ही पावसाळ्यात चहा पकोडे आणि भजी ठेवतो. (बारिश के टाइम तो चाय-पकौड़े रखते हैं यार, आपने तो एशिया कप रख दिया) तुम्ही तर आशिया चषक ठेवला.” भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याबद्दल सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील दुसरा डाव सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला होता. त्या सामन्यात पहिल्या डावातील संपूर्ण ५० षटके खेळली गेली. मात्र दुसऱ्या डावात एकही चेंडू टाकला गेला नाही.

माजी पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनीही एसीसीवर साधला निशाना

पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, “हे खूपच निराशाजनक आहे. पावसाने क्रिकेटचा सर्वात मोठा सामना खराब केला. एसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआय यांनी फालतू कारण देत ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली. त्यावेळी मी पीसीबी चेअरमन असल्याने ‘एसीसी’ला यूएईमध्ये खेळण्याची विनंती केली होती, पण त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. ‘त्यांनी नेहमीच काय यूएई’ असे म्हणत श्रीलंकेला सामावून घेण्याचे चुकीचे निमित्त केले.”

सेठी पुढे म्हणाले, “’दुबईत खूप गरम हवामान असते’, हे कारण सांगत एसीसीने प्रस्ताव नाकारला.” नजम सेठी पुढे म्हणाले, “जेव्हा सप्टेंबर २०२२ मध्ये आशिया चषक खेळला गेला तेव्हा हे वातावरण नव्हते का? एप्रिल २०१४ आणि सप्टेंबर २०२० मध्ये जेव्हा आयपीएल खेळला गेला तेव्हा इथले हवामान तितकेच गरम होते. त्यावेळी हे कारण आठवले नाही का? हे सर्व पीसीबीविरुद्ध कारस्थान केले गेले. बीसीसीआय, भारत सरकार आणि एसीसी यांनी खेळात राजकारण केले असून हे अक्षम्य आहे.”

हेही वाचा: Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह झाला बाप माणूस, संजना गणेशनने दिला मुलाला जन्म; आशिया चषकातून परतला घरी

भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात टीम इंडियाने जिंकली नाणेफेक

आशिया कपमध्ये भारताचा दुसरा सामना नेपाळशी आहे. नेपाळच्या संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी भारताचा पाकिस्तानसोबतचा पहिला सामना पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि नेपाळमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल. मात्र, नेपाळसाठी भारताला हरवणे अत्यंत कठीण असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barish ke time to chai pakode ruchan hain yaar aapane to asia cup rakh diya sehwag taunts acc regarding india pak match avw
Show comments