Basit Ali replied to Sourav Ganguly saying Dadaji is trying to play mind games: यंदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात होणार आहे. ज्यासाठी आयसीसीने काही दिवसांपूर्वी वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार, ५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळला जाईल, जो १९ नोव्हेंबरपर्यंत चालेल. दुसरीकडे, १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ज्यासाठी दोन्ही देशांचे चाहते खूप उत्सुक आहेत.
त्याचबरोबर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनीही या सामन्याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरं तर, अलीकडेच भारताचा माजी खेळाडू सौरव गांगुली म्हणाला की भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापेक्षा अधिक रोमांचक असेल कारण भारत पाकिस्तानविरुद्ध सहज जिंकेल. यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू बासित अलीने सौरव गांगुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वास्तविक बासित अली म्हणाला की, “तो गांगुलीशी मताशी अजिबात सहमत नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला की, “जेव्हा मी सौरव गांगुलीचे विधान वाचले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे उच्च स्तरीय क्रिकेट खेळले आहे आणि अनेक खेळाडू घडवणारा एक हुशार कर्णधार होता. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताच्या बाजूने एकतर्फी होईल या त्यांच्या मताशी मी सहमत नाही.”
हेही वाचा – MS Dhoni: “बेन स्टोक्समध्ये धोनीप्रमाणे…”, रिकी पाँटिंगचे इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराबद्दल मोठं वक्तव्य
बासित अली पुढे म्हणाला की, “तुम्ही आम्हाला याआधीच्या आयसीसी विश्वचषकात खूप सामन्यात पराभूत केले आहे, यात शंका नाही, परंतु २०१७ नंतर असे झाले नाही. यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात आणि त्यानंतर गेल्या वर्षीच्या आशिया कपमध्ये आम्ही भारताला हरवले, एक जिंकला आणि एक हरला. होय, ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते, पण ते संपूर्णपणे विराट कोहलीच्या जोरावर होते. तो त्यांनी एकहाती जिंकला. अर्थात ही त्याची आजपर्यंतची सर्वोत्तम खेळी होती.”
दादाजी फक्त माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहेत –
यासोबतच बासित अली म्हणाला की, “भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा भारत विरुद्ध पाकिस्तानपेक्षा जास्त गर्दीचा सामना आहे. त्यावर मला एवढेच म्हणायचे आहे, ‘भाऊ, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा तुमच्या देशात रस्ते रिकामे असतात का? नाही, जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो तेव्हा रस्ते रिकामे असतात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असे असते. प्रत्येकजण त्यांच्या टीव्ही स्क्रीनला चिकटून प्रार्थना करत असतो. विश्वचषकाच्या तिकिटांच्या किंमतीवर देखील नजर टाका. त्यामुळे मला वाटते की, दादाजी फक्त माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहेत.”