Batman Hits Six Threw Bat in The Air Umpire Injured : क्रिकेटच्या मैदानावरील प्रत्येक खेळाडूला आपला संघ त्याच्या स्वत:मुळे जिंकावा असे वाटते. त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नही करतो. जर त्याच्या प्रयत्नाने संघ जिंकला, तर त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. यानंतर त्याचे सेलिब्रेशन हे बघण्यासारखे असते. अशाच एका सेलिब्रेशनमध्ये एका खेळाडूने अशी चूक केली की त्याचा फटका अंपायरला सहन करावा लागला. ही घटना झिम्बाब्वेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
शेवटच्या चेंडूवर ४ धावांची होती गरज –
वास्तविक येथे स्थानिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सोगो रेंजर्स आणि रेनबो-१ संघ यांच्यात ४५-४५ षटकांचा सामना झाला. यामध्ये सोगो रेंजर्सने प्रथम फलंदाजी करताना ४४.१ षटकात २२९ धावा केल्या. त्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रेनबो संघाने ४४.५ षटकात २२६ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत त्यांना विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चार धावा करायच्या होत्या.
फलंदाजाच्या आनंदाला उरला नाही पारावार –
रोमांचक सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंच्या हृदयाचे ठोके वाढत होते. अशा स्थितीत गोलंदाज रेयान बर्लने शेवटचा चेंडू टाकताच फलंदाज फ्रान्सिस सँडेने दमदार षटकार ठोकला. आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर फ्रान्सिस सँडेच्या आनंदाला पारावार उरला नाही. या आनंदाच्या भरात त्याने आपली बॅट हवेत फेकली आणि ती पडताच ती नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या अंपायरच्या पायावर आदळली. त्यामुळे त्याला दुखापत झाली. यानंतरही सँडे थांबला नाही तो मैदानावरच नाचू लागला. त्याचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Lakshya Sen : ‘करो या मरो’च्या लढतीत लक्ष्य सेनच्या भन्नाट शॉटने चाहते अवाक्, VIDEO होतोय व्हायरल
काही दिवसापूर्वी टीम इंडियाने झिम्बाब्वेचा दौरा केला होता. या दौऱ्यात टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकली होती. यानंतर संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे, जिथे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्विप दिला. गेल्या सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेला २ ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.