अॅडलेड : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा खेळण्यासाठी आव्हानात्मक असणारा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाईल आणि मी माझ्या नातवंडांना अभिमानाने सांगेन की मी बुमराचा सामना केला होता, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने बुमराविषयीचा आदर बोलून दाखवला.

दौरा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रसार माध्यमांनी बुमराबद्दल व्यक्त केलेली भीती आता पहिल्या कसोटीनंतर त्याच्या कौतुकात परावर्तित होताना दिसत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील भारताच्या विजयात बुमराची गोलंदाजी निर्णायक ठरली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील प्रत्येक क्रिकेटतज्जांनी बुमराच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सराव सत्रानंतर हेडने पत्रकारांशी बोलताना बुमराविषयी आदर व्यक्त केला. ‘‘बुमरा क्रिकेटमध्ये खेळायला कठीण असणारा एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जाईल आणि आम्ही या क्षणी तो किती आव्हानात्मक ठरू शकतो याचा शोध घेत आहोत. त्याच्याविरुद्ध खेळायला खूप छान वाटते,’’ असे हेड म्हणाला.

हेही वाचा >>> बांगलादेशात शांतिसेना पाठवावी! ममता बॅनर्जी यांची मागणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची विनंती

‘‘त्याच्यासोबत खेळली गेलेली ही वाईट मालिका नाहीच. आशा आहे की मी अजून काही वेळा त्याचा सामना करू शकेन. तो आव्हानात्मक गोलंदाज आहे. यानंतर मी भविष्यात माझ्या नातवंडांना मी बुमराचा सामना केला होता असे अभिमानाने सांगू शकेन,’’ असे हेडने सांगितले.

बुमराने पहिल्या विजयी कसोटीत आठ गडी बाद केले. या वर्षाच्या सुरुवातीला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाचा शिल्पकार आणि सामन्याचा मानकरी तोच होता. पर्थमध्ये बुमरासमोर उभा राहू शकलेला हेड हा एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाज होता. स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लबूशेन या प्रमुख फलंदाजांना संघर्ष करावा लागत होता. पण, यानंतरही यापैकी कुणीही माझ्याकडून त्याला कसे खेळायचे याविषयी सल्ला घ्यायला येणार नाहीत, असे हेडला वाटते. शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र खेळविण्यात येईल.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघात फूट असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, हेडने हे वृत्त फेटाळून लावले. ‘‘आम्ही झुंजणारी फलंदाजी केली. त्यानंतरही आम्ही हरलो म्हणजे आमच्यात मतभेद आहेत असे होत नाही,’’ असे हेड म्हणाला.

बुमराकडे सर्वोत्तम कर्णधार बनण्याची क्षमता पुजारा

पहिल्या कसोटीत बुमराने भारतीय संघाला चांगले नेतृत्व दिले. एक चांगला कर्णधार बनण्याची क्षमता त्याच्याकडे निश्चित आहे. रोहित शर्मानंतर त्याच्याकडे दीर्घकालीन कर्णधार म्हणून बघायला काहीच हरकत नाही, असे भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा म्हणाला. घरच्या मैदानावरील मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना कसा करायचा हे बुमराने दाखवून दिले. विशेष म्हणजे तो माध्यमांशी बोलताना प्रत्येक वेळेस संघाबाबत आणि अन्य खेळाडूंबाबत बोलला. स्वत:विषयी त्याने कधीच भाष्य केले नाही, असेही पुजाराने निदर्शनास आणले.