टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पकिस्तान सामन्यात डेव्हिड वॉर्नरने दोन टप्पा चेंडूवर लगावलेला षटकार चांगलाच वादाचा विषय ठरला. गौतम गंभीरसारख्या काहींनी हा षटकार खेळ भावनेच्याविरोधात होता असं म्हटलं तर काहींना मात्र वॉर्नरने केलं ते योग्यच असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र वॉर्नरच्या या फटक्यानंतर आता सोशल नेटवर्किंगवर त्याचीच स्टाइल फॉलो करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात गोंधळ उडालेल्या एका स्थानिक स्तरावरील खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल होतोय. वॉर्नरप्रमाणे दोन टप्पा चेंडू थेट सीमेपार लगावण्याचा या फलंदाजाच्या प्रयत्नाचा शेवट त्याच्या फजेतीमध्ये झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा >> दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हे लज्जास्पद असून वॉर्नरने…”

डेव्हिड वॉर्नर आणि या खेळाडूने केलेल्या प्रयत्नामध्ये दोन समानता आहे. पहिली म्हणजे चेंडू दोन टप्पे पडला तरी फलंदाजापर्यंत पोहचलाच नाही. दुसरी म्हणजे फलंदाज स्वत: क्रिज सोडून चेंडू टोलवण्यासाठी गेला. मात्र डेव्हिड वॉर्नरने या चेंडूवर थेट षटकार लगावला तर इथे मात्र या खेळाडूची गडबड झाली. चेंडूवर षटकार लगावण्याच्या उद्देशाने क्रिझबाहेर आहे. वॉर्नर तरी फटका मारताना क्रिजपासून जवळ होता, मात्र हा खेळाडू अर्ध्याहून अधिक पीचवर आला अन् तो गंडला.

नक्की पाहा हे फोटो >> राहुल द्रविडमधील ‘र’ अन् सचिन तेंडुलकरमधील ‘चिन’ = रचिन; जाणून घ्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रचं जवागल श्रीनाथ कनेक्शन

क्रिजवर अर्ध्याहून अधिक पुढे येऊन दोन टप्पा चेंडू टोलवण्याची संधी या फलंदाजाकडून हुकली आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षण करणाऱ्याकडे गेला. त्याने लगेच चेंडू विकेटकीपरकडे फेकला आणि विकेटकीपरने यष्ट्या उडवल्या. यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने फलंदाज धावबाद झाल्याची अपील केली. ज्यावर पंचांनी खेळाडूला धावबाद घोषित केलं. दोन टप्पा पडल्याने चेंडू नो बॉल असला तरी नो बॉलवर फलंदाज धावबाद होऊ शकतो आणि तेच इथे घडलं.

नक्की पाहा >> Video: मार्टिन गप्टिलचा No Look Six… चहरने दिलेली खुन्नस अन् पुढच्याच चेंडूवर…

दरम्यान, आपण धावबाद होणार हे लक्षात आल्यानंतर या फलंदाजाने पुन्हा क्रिजमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. हा सारा मजेदार प्रकार सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे. त्याच्या व्हिडीओ व्हायरल होतोय. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

नक्की वाचा >> सकाळी ICU मधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला

या गोंधळामुळे अनेकांना वॉर्नरने मोहम्मद हाफीजच्या नो बॉलवर लगावलेला षटकार तर आठवलाच पण वॉर्नरने लगावलेला षटकार हा क्लास होता आणि या खेळाडूची झालेली फजेती आहे असं अनेकांनी म्हटलं आहे.