केंद्र सरकारने आयपीएलच्या तेराव्या हंगामाला मान्यता दिल्यानंतर बीसीसीआय तेराव्या हंगामाच्या तयारीला लागलं आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या खेळाडूंसाठी सराव शिबीर सुरु केलं आहे. १५ ते २० ऑगस्ट दरम्यान चेन्नईचे खेळाडू सराव करणार आहेत. महेंद्रसिंह धोनीसह सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, पियुष चावला, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड असे महत्वाचे खेळाडू कँपसाठी चेन्नईत दाखल झाले आहेत. वर्षभराच्या कालावधीनंतर धोनीला मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी देखील या हंगामासाठी सज्ज असून धोनीसाठी आयपीएलमध्ये फलंदाजीत चौथ्या क्रमांकाची जागा योग्य असेल असं मत हसीने व्यक्त केलंय.
अवश्य वाचा – IPL 2020 : दोन पुणेकर पोहचले चेन्नईत, CSK कँपमध्ये होणार सहभागी
“माझ्यामते धोनीसाठी चौथ्या क्रमांकाची जागा ही योग्य आहे. परंतू मधल्या फळीत खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्व खेळाडू यंदा आपलं चौथं विजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहेत. मैदानात उतरल्यानंतर सरावाला सुरुवात केल्यानंतर ते आपल्या फॉर्मात परततील असा मला विश्वास आहे”, हसी आपल्या संघातील खेळाडूंच्या तयारीबद्दल बोलत होता.
अवश्य वाचा – IPL 2020 : Tata Sons स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत आघाडीवर??
चेन्नई संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कँपसाठी विशेष सोय केली असून सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात येत आहे. दरम्यान, परदेशी खेळाडूंना अद्याप या सराव शिबीरात सहभागी होण्याची संधी मिळालेली नसली तरीही संघ युएईत दाखल झाल्यानंतर परदेशी खेळाडू संघात सहभागी होतील. तसेच युएईला रवाना होण्याआधी सर्व खेळाडूंची करोना चाचणी केली जाणार आहे.
अवश्य वाचा – १० सेकंदाच्या जाहीरातीसाठी १० लाख ! IPL प्रक्षेपण करणाऱ्या Star Sports ने आखलाय मेगाप्लान