मेलबर्न रेनेगेड्स संघाने बिग बॅश लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेलबर्न स्टार्सला पराभूत केले आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. आता २४ तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २ टी २० आणि ५ एकदिवसीय सामान्यांची मालिका सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियात भारताने केलेल्या पराभवानंतर आता फिंच आणि कंपनी भारतात पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक आहे. पण या दरम्यान, फिंचचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.
फिंचच्या रेनेगेड्स संघाने स्टार्स संघाचा पराभव केला खरा, पण फिंचला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अंतिम सामन्यात तो केवळ १३ धावा करून तंबूत परतला आणि त्याचा राग त्याने चक्क खुर्चीला झोडपून काढला. १० चेंडूत २ चौकार लगावत त्याने १३ धावा काढल्या होत्या. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तो धावबाद झाला. या गोष्टीचा त्याला खूप राग आला. त्यामुळे त्याने तंबूत परतल्यानंतर खुर्चीवर बटने जोरदार फटका मारला.
Best shot Finch has played all summer #BBLFinal pic.twitter.com/GoZrEvfyyi
— Alex Black (@VirtualAlexB) February 17, 2019
दरम्यान, या कृत्यामुळे अॅरोन फिंचला कारवाईला सामोरे जावे लागले. बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात त्याने लेव्हल १ पद्धतीच्या नियमाचे उल्लंघन केले. २.१.२ कलमान्वये मैदानावरील सामानाची तोडफोड करण्याच्या गुन्ह्यात त्याला दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.