बिग बॅश लीगच्या (BBL 2021) या सीझनमध्ये जोश फिलिप आणि ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीत तर अँड्र्यू टाय आणि झहीर खान यांनी गोलंदाजीत कहर केला आहे. मात्र मंगळवारी सिडनी सिक्सर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात मैदानावर चाहत्यांना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. सिडनीच्या फलंदाजीदरम्यान अॅडलेड संघाचा कर्णधार पीटर सिडलने सहकारी खेळाडू डॅनियल वॉरेलच्या गालावर किस केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिग बॅश लीगच्या या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सचा कर्णधार पीटर सिडलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना अॅडलेडने २० षटकांत ८ बाद १४७ धावा केल्या. अॅडलेडकडून थॉमस केलीने सर्वाधिक ४१ धावा केल्या. या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी अॅडलेड संघाकडून डॅनियल वॉरॉल पहिले षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी कॅप्टन पीटर सिडल क्षेत्ररक्षणासाठी आला होता.
नक्की पाहा – PHOTOS : जगातील सर्वात HOT महिला गोल्फरला पाहिलेत का? अजूनही आहे सिंगल!
पहिल्या चेंडूनंतर डॅनियल कॅप्टन सिडलशी बोलायला गेला. यादरम्यान सिडलने वॉरेलचे चुंबन घेतले. या प्रसंगाला नेटरी ब्रोमान्स म्हणत आहेत. या सामन्यात सिडल महागडा ठरला. त्याने ३.२ षटकात ४० धावा दिल्या. त्याच्या चेंडूंवर फलंदाजांनी ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. सिडनी सिक्सर्सने विजयासाठी १९.२ षटकांत १४८ धावांचे लक्ष्य गाठले. सिडनीकडून सीन अॅबॉटने १० चेंडूत नाबाद १९ धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. त्याचवेळी कर्णधार मोइसेस हेन्रिक्सने २८ धावा केल्या.