ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या शानदार फॉर्ममध्ये असून थांबण्याचे नाव घेत नाहीये. बिग बॅश लीगमध्ये स्मिथ ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो स्पर्धेतील अनेक विक्रम मोडण्याच्या तयारीत असल्याले दिसत आहे. लीगमध्ये सलग २ झंझावाती शतके झळकावणाऱ्या या फलंदाजाने सोमवारी फक्त एका चेंडूत १६ धावा काढण्याचा पराक्रम केला आहे.

बीबीएलमध्ये सोमवारी सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात हरिकेन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथ जोश फिलिप्ससोबत सलामीला आला. डावाचे दुसरे षटक टाकण्यासाठी जोएल पॅरिस आला होता. या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर स्मिथने लेग साईडला षटकार मारला. अंपायरने तो नो बॉल दिला. त्यामुळे सिडनीच्या धावसंख्येत ७ धावांची भर पडली.

त्यानंतर जोएल पॅरिसने पुढचा चेंडू वाइड फेकला जो यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या आवाक्याबाहेर गेला आणि सीमापार गेला. यावर ५ धावा आल्या. आतापर्यंत पॅरिसने एकही चेंडू न टाकता १२ धावा दिल्या होत्या. त्याने पुढचा चेंडू मधल्या यष्टीवर टाकला, ज्यावर स्मिथने आपल्या खास शैलीत लेग साइडला चौकार लगावला. अशा प्रकारे सिडनी सिक्सर्सने एका चेंडूत १६ धावा केल्या.

स्मिथची ४४ चेंडूत ६६ धावांची वादळी खेळी –

होबार्ट हरिकेन्सविरुद्ध स्मिथने २०० च्या स्ट्राईक रेटने ३३ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याने ६ षटकार आणि ४ चौकार लगावले. स्मिथने बीबीएलच्या ४ सामन्यात ३२७ धावा केल्या. शनिवारी त्याने सिडनी थंडरविरुद्ध ६६ चेंडूत १८९.३९ च्या स्ट्राईक रेटने १२५ धावा केल्या. या आपल्या खेळीत त्याने ५ चौकार आणि ९ षटकार लगावले. स्मिथचे हे लीगमधील सलग दुसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना ५६ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या.

Story img Loader