BBL 2025 Daniel Sams and Cameron Bancroft clashing Video : शुक्रवारी बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि पर्थ स्कॉचर्स हे संघ आमनेसामने होते. पण या मॅचमध्ये असं काही घडलं की संपूर्ण स्टेडियम हादरलं. वास्तविक, डॅनियल सॅम्स आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट सिडनी थंडरविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना एकमेकांना जोरात धडकले. ही टक्कर इतकी भीषण होती की, दोन्ही खेळाडूंना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता डॅनियल सॅम्स आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट एकमेकांना धडकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या तुफान व्हायरल होत आहे.
ही घटना पर्थ स्कॉचर्सच्या १६व्या डावातील आहे. पर्थ स्कॉचर्सचा फलंदाज कूप कॉनोलीने शॉट खेळला, पण चेंडू हवेत उंच गेला. यानंतर डॅनियल सॅम्स आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट झेल पकडण्यासाठी धावले. दोन्ही खेळाडूंची नजर चेंडूवर होती, त्यामुळे दोन्ही खेळाडूंची जोरात धडक झाली. या धडकेत डॅनियल सॅम्स आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यापैकी एकाच नाक फुटलं
डॅनियल सॅम्स आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्टमध्ये जोरदार धडक –
दोन्ही संघांच्या खेळाडूंशिवाय स्टेडियममध्ये सामना पाहणाऱ्या चाहत्यांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. यावर सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
शेवटच्या चेंडूवर सिडनी थंडरने पर्थ स्कॉचर्सचा पराभव केला –
या सामन्याबद्दल बोलायचे, तर सिडनी थंडरने पर्थ स्कॉचर्सचा ४ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पर्थ स्कॉचर्सने २० षटकांत ४ गडी गमावून १७७ धावा केल्या होत्या. ज्यामुळे सिडनी थंडरसमोर १७८ धावांचे लक्ष्य होते. या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर सिडनी थंडरने लक्ष्य गाठले. सिडनी थंडरच्या विजयाचा हिरो ठरला शेर्फेन रदरफोर्ड. या खेळाडूने १९ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. या शानदार खेळीमुळे सिडनी थंडरला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवता आला.